महाळुंगेत पाच लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:39+5:302021-02-05T05:08:39+5:30

महाळुंगे येथे सद्गुरु नगरमध्ये सापळा रचून केलेल्या कारवाईत पाच लाखांच्या गुटख्यासह दोन लाखांचा टेम्पो असा सुमारे सहा लाख ...

Gutkha worth Rs 5 lakh seized in Mahalunga | महाळुंगेत पाच लाखांचा गुटखा जप्त

महाळुंगेत पाच लाखांचा गुटखा जप्त

महाळुंगे येथे सद्गुरु नगरमध्ये सापळा रचून केलेल्या कारवाईत पाच लाखांच्या गुटख्यासह दोन लाखांचा टेम्पो असा सुमारे सहा लाख बाराशे एकोणसाठ रुपये इतर रोख रकमेचा माल व मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संतोष देवीप्रसाद आग्रहरी (वय ३६, रा. सद्गुरूनगर महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

त्याची चौकशी सुरू आहे.

राज्यात गुटखा निर्मिती आणि विक्री करण्यास कायदेशीर बंदी असूनही मौजे महाळुंगे येथील संतोष देवीप्रसाद आग्रहरी हा टपरीत छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करत असल्याची माहिती बातमीदाराकडून सामाजिक सुरक्षा शाखेचे निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना मिळाली होती.

आरोपी आज छुप्यारीतीने टपरीमध्ये गुटका विकत असून त्याच्याकडे गुटका व अवैध माल असल्याची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये तीन लाख चौतीस हजार चारशे नव्यान्नव रुपयांचा गुटखा पोलिसांच्या हाती लागला.

तीन लाख पन्नास रुपयांचा टेम्पो नऊ हजार सातशे साठ रुपये रोख रक्कम व सात हजार रुपयाचा अँड्रॉइड मोबाईल एकूण सहा लाख एक हजार दोनशे एकोणसाठ असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संतोष आग्रहहरी याला पुढील तपासासाठी महाळुंगे पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघमारे, पोलीस हवालदार संतोष असवले, संदीप गवारी, अनंत यादव, महेश बारकुले, दीपक साबळे, अमोल शिंदे, वैष्णवी गावडे, योगेश शेळके, मारोतराव जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

--

२८महाळुंगे क्राईम

फोटो

महाळुंगे येथे अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्या आरोपीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने अटक केली

Web Title: Gutkha worth Rs 5 lakh seized in Mahalunga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.