शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

बाथरूममध्ये गुदमरून १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

By admin | Updated: March 7, 2015 00:07 IST

मैत्रिणीकडे धुळवड खेळण्याकरिता गेलेल्या १४ वर्षीय मुलीचा अंघोळीला गेल्यानंतर बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना कोथरूडमध्ये शुक्रवारी दुपारी घडली.

पुणे : मैत्रिणीकडे धुळवड खेळण्याकरिता गेलेल्या १४ वर्षीय मुलीचा अंघोळीला गेल्यानंतर बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना कोथरूडमध्ये शुक्रवारी दुपारी घडली. गॅस गीझरमुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून गेल्या दोन महिन्यांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.ॠतुजा चंद्रशेखर पवार (वय १४, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती आणि तिचे आई-वडील सुरुवातीला कोथरूडमधील कुंबरे पार्कमध्ये राहत होते. त्यानंतर ते सिंहगड रस्त्यावरील आनंदनगरमध्ये राहण्यास गेले. दस्तुर हायस्कूलमध्ये नववीमध्ये शिकत असलेली ॠतुजा शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कुंबरे पार्कमध्ये मैत्रिणीकडे रंग खेळायला आली होती. मित्रमैत्रिणींसह रंग खेळून झाल्यावर वैष्णवी भालेराव यांच्या घरी ती अंघोळीला गेली. भालेराव यांची मुलगी तिची मैत्रीण आहे. धुळवड खेळल्यानंतर अंघोळीला गेल्यावर हा प्रकार घडला. (प्रतिनिधी)४बाथरूममधील गॅस गीझर सुरूच होता. बराच वेळ ती बाथरूमबाहेर आली नाही, तसेच तिचा आवाजही येत नाही म्हटल्यावर सर्वांनी बाथरूमचे दार वाजवायला सुरुवात केली. बराच वेळ आवाज देऊनही प्रतिसाद मिळेनासा झाल्यावर त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. दार तोडल्यानंतर बाथरूममध्ये ॠतुजा बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. त्या वेळी गीझर सुरूच होता, तसेच पाणीही खूप मोठ्या प्रमाणावर गरम झालेले होते. ॠतुजाला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु डॉक्टरांनी तिला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. ॠतुजाचे वडील भारत फोर्जमध्ये अभियंता आहेत. तिला एक मोठी बहीणही आहे. ॠतुजाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.