Pune Crime: नशेसाठी पैसे न दिल्याने नातवानेचं आजीवर केला चाकूने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 14:42 IST2021-10-03T14:42:48+5:302021-10-03T14:42:55+5:30
मुलगा कामधंदे करत नसून लागले होते व्यसन

Pune Crime: नशेसाठी पैसे न दिल्याने नातवानेचं आजीवर केला चाकूने वार
पुणे : नशेचे व्यसन लागलेल्या नातवाने नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून आपल्या आजीला मारहाण करुन तिच्यावर चाकूने हल्ला केला आहे. याप्रकरणी लोहियानगरमध्ये राहणाऱ्या एका ५६ वर्षाच्या महिलेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन खडक पोलिसांनी त्यांच्या १८ वर्षाच्या नातवाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, या आजी लोहियानगरमध्ये राहतात. त्यांच्या मुलीच्या मुलगा काही कामधंदा करत नाही. त्याला व्यसन लागले आहे. त्यासाठी तो नेहमी आजीकडे पैसे मागत असतो. त्याने शनिवारी सकाळी साडेदहा वाजता आपल्या आजीकडे नशा करण्यासाठी पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने त्याने आपल्या आजीला लाकडी बांबुने पाठीवर व पोटावर हाताने मारले. बारीक चाकूने डाव्या कानाखाली वार करुन जखमी केले आहे. सहायक पोलीस फौजदार मोढवे तपास करीत आहेत.