ग्रामपंचायतीची खाती गोठविण्याचे फर्मान!

By Admin | Updated: January 23, 2017 02:39 IST2017-01-23T02:39:30+5:302017-01-23T02:39:30+5:30

पुणे जिल्हा हगणदरीमुक्तकरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील चार तालुके वगळता बाकी सर्वच जिल्ह्यांत

Gram Panchayat's order to freeze accounts! | ग्रामपंचायतीची खाती गोठविण्याचे फर्मान!

ग्रामपंचायतीची खाती गोठविण्याचे फर्मान!

लासुर्णे : पुणे जिल्हा हगणदरीमुक्तकरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील चार तालुके वगळता बाकी सर्वच जिल्ह्यांत उदासीनता दिसून येत आहे. यामध्ये इंदापूर तालुका सर्वाधिक पिछाडीवर आहे. यातच तालुक्यात शौचालयासाठी अपुरा निधी असतानाही जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतीची खाती गोठविण्याचे फर्मान काढले आहे. तालुक्यासाठी तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला जातोय, असे म्हणण्याची वेळ शौचालय लाभार्थ्यावर आली आहे.
आज इंदापूर तालुक्यात बारा ते तेरा हजार कुटुंबे शौचालयाविना असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील ग्रामपंचायतीची खाती गोठविण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यात निधी न देता शौचालय बांधा, नाहीतर विकासकामे थांबविली जातील. त्यामुळे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार ’असे म्हणण्याची वेळ तालुक्यातील नागरिकांवर आली आहे.
लासुर्ण्यातील सामाजिक कार्यकर्ते गजानन वाकसे व आरटीआय कार्यकर्ते पंकज निंबाळकर यांनी ग्रामविकास अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. यावेळी असे निर्दशनास आले की, निधीअभावी पंचायत समितीत लासुर्णे गावातील ५९ प्रस्ताव पडून आहेत. बाकीच्या गावातील परिस्थिती ही अशीच असल्याचे दिसून आले. यावर इंदापूरचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले यांच्याकडे विचारणा केली असता आलेल्या निधीचे लाभार्थ्यांना वाटप केले
आहे, उर्वरित प्रस्तावासाठी वाढीव निधी लवकरच येईल, असे
सांगण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Gram Panchayat's order to freeze accounts!