शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

थापांचा पाऊस पाडणाऱ्या सरकारला दुष्काळ दिसेना- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 01:32 IST

केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे, हे दिसत नाही.

खेड/राजगुरुनगर : ‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे, हे दिसत नाही. या दुष्काळात गाजराची शेती मात्र बहरली आहे,’’ अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.राजगुरुनगर येथे सोमवारी शेतकरी मेळावा तसेच क्रांतिकारकांच्या स्मारकाचे अनावरण व हुतात्मा राजगुरू पुलाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. या प्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, खासदार श्रीरंग बारणे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार नीलम गोºहे, सुरेश गोरे व गौतम चाबुकस्वार, संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, माजी सभापती रामदास ठाकूर, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘सरकार शेतकºयांना फसवत आहे. दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळ त्यांना दिसत नाही. योजना आणि थापांचा पाऊस त्यांचा सुरू आहे.’’ केवळ गाजराची शेती बहरली आहे, असा टोला त्यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला. संपूर्ण कर्जमुक्तीची शिवसेनेची मागणी असताना कुचकामी व फसवी कर्जमाफी देऊन महाराष्ट्रातील शेतकºयांना फसविण्यात आले.खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले, ‘‘खेडमध्ये राजगुरूंच्या नावाने अनेक संघटना आहेत; मात्र कोणीही यथोचित स्मारक उभारले नाही. १९७८मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते यापूर्वीच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन झाले होते. त्या वेळेस त्यांनी तिन्ही शहिदांचे पुतळे उभारण्याची सूचना केली होती. आज ४० वर्षांनी ते पूर्णत्वास आले आहे. डॉ. आंबेडकरांचेही भव्य स्मारक उभारण्याची मागणी आहे. आगामी काळात हे स्मारक उभारले जाईल.’’या वेळी आढळराव यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. खेड तालुका हा सर्वांत आवडीचा मतदारसंघ असल्याने येथे जास्तीस जास्त निधी देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. येथील दिलावरखान स्मारक आतापर्यंत सर्वांकडून दुर्लक्षित राहिले; मात्र आपण केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करून त्याला ३ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अथक पाठपुरावा करून केदारेश्वर पूल बांधला आहे. बनकरफाटा ते राजगुरुनगर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण करणार आहे. बैलगाडा शर्यतीत अडथळे आणणाºया पेटा संघटनेला धडा शिकवणार आहे, असे ते म्हणाले. या वेळी आमदार सुरेश गोरे यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर यांनी आभार मानले.>अजित पवारांना धरणांकडे फिरकू देऊ नकासध्या राष्ट्रवादी पक्षाची भीती वाटते, कारण धरणे सुकू लागली आहेत. धरणांच्या आजूबाजूलाही अजित पवारांना फिरकू देऊ नका, अशी उपरोधिक टीका त्यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. न्यायासाठी माझी भूमिका असून ती सरकारविरोधात असली तरी मला त्याची फिकीर नसल्याचे ठाकरे म्हणाले. भगव्याचे राज्य येणारच, असे सांगून बैलगाडा शर्यत सुरू करणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे