कोल्हापूर, सांगलीच्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी द्यावी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 05:55 PM2019-08-08T17:55:29+5:302019-08-08T18:01:50+5:30

सांगली आणि कोल्हापूरमधील महापुराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी

Government should gives debt waiver to Kolhapur, Sangli farmers : Sharad Pawar | कोल्हापूर, सांगलीच्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी द्यावी 

कोल्हापूर, सांगलीच्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी द्यावी 

Next

पुणे : पुराच्या तडाख्याने पिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान सोसत आलेल्या सांगली, कोल्हापूर भागातील सर्व शेतकऱ्यांना सरकारने १०० टक्के कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. 

   पुण्यातील श्रमिक पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष चेतन तुपे, महापालिका गटनेता दिलीप बराटे उपस्थित होते. 

 गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील कोल्हापूरसांगली जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. पुराचे मोठे स्वरूप समोर आल्यावर सत्ताधारी भाजपसह सर्व राजकीय पक्ष पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. याच संदर्भात पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. 

     पुढे पवार म्हणाले की, या भागात जास्त प्रमाणात उसाचे उत्पादन होते. बहुतांश वेळा ऊस पिकवणारा शेतकरी हा बँकेचे किंवा सोसायटीचे कर्ज घेऊन पेरणी करतो. परंतु यंदा आलेल्या संकटामुळे त्यांचे सर्वच पीक वाया गेले आहे. काही ठिकाणी तर उसाच्या उंचीइतके पाणी आहे. त्यामुळे पीक वाया गेले असताना, संसार उद्धवस्त झाला असताना शेतकऱ्यांना नवीन पेरणीचा खर्च असताना सरकारने १०० टक्के कर्जमाफी करण्याची गरज आहे.  यामुळे द्राक्ष, ऊस आणि इतर भाज्या पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. 

या पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • एनडीआरएफ सारखी यंत्रणा राज्य सरकारने करणे गरजेचे आहे.

 

  • 2005पेक्षा यावेळी परिस्थिती गंभीर आहे. यंदा चित्र अधिक गंभीर आहे.

 

 

  • कोल्हापूर आणि सांगली हा राज्यासाठी महत्वाचा भाग आहे. इथून संपूर्ण राज्यात सर्वाधिक दुधाचा पुरवठा होता. 

 

  • या भागात चहुबाजूंनी नुकसान झाले आहे. अशी स्थिती माझ्या पाहण्यात आलेली नाही. यावेळी पूराची व्याप्ती मोठी आहे. अभूतपूर्व नुकसानाला राज्य तोंड देत आहे.

 

  • सरकारने पाणी आटल्यावर ताबडतोब पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी. 

Web Title: Government should gives debt waiver to Kolhapur, Sangli farmers : Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.