शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सरकारी पर्जन्यमापके म्हणजे निव्वळ भंपकगिरी: आपची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 19:06 IST

पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्यावर त्या भागाची पाहणी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या असल्याचे आप चे म्हणणे आहे

ठळक मुद्देआप च्या कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

पुणे: सांगली, कोल्हापूर आणि सातारा या भागातील सरकारी पर्जन्यमापके म्हणजे निव्वळ भंपकगिरी असल्याची टीका आम आदमी पार्टी (आप) ने केली. पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्यावर त्या भागाची पाहणी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या असल्याचे आप चे म्हणणे आहे. त्यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आप च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.आप चे पुणे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत तसेच श्रीकांत आचार्य म्हणाले, या तिन्ही जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांमध्ये किती निष्काळजीपणा आहे. पौड चा लिपिक जिल्हाधिकारी कार्यालयास माहिती पुरवतो, त्याचे उपकरण घोटावडे येथे असल्याचे सांगण्यात आले, मात्र ते कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही. पिरंगुट येथे उपकरण ऊंच टाकीवर आहे पण तिथे जायची सोय नाही. शेद्रेवाडी येथील शेतातील उपकरण त्यासाठीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने काढून टाकले आहे . पौड येथे उपकरण सार्वजनिक ठिकाणी असून ते कोणीही कधीही हाताळत असते. आप ने स्थानिक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली अशी माहिती देऊन आचार्य म्हणाले, महसूल उपायुक्तांनी हे काम कृषी विभाग व पाटबंधारे खाते करत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडेही याबाबत पुरेशी माहिती नाही. ही जबाबदारी कोणावर आहे हे कोणीच सांगू शकत नाही. या ढिसाळपणामुळेच आपत्तीची पुर्वसूचना मिळणे अवघड आहे.स्थानिक अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळाले नसल्यामुळेच आप ने पुण्यात निदर्शने करून सरकारला निवेदन देऊन जाग आणण्याचा प्रयत्न केला असे किर्दत यांनी सांगितले. ते म्हणाले, सरकारने सांगली कोल्हापूरसाठी नुकसानीच्या तुलनेत केलेली ३५ कोटी रूपयांची मदत तटपुंजी आहे. केंद्राकडे निधी मागितला आहे, मात्र त्याबाबत काहीच हालचाल दिसत नाही. केंद्रीय आपत्ती निवारण आराखड्यानुसार पूरग्रस्त लोकांचे संपूर्ण पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यांना नवीन घरे बांधून देणे, घरदुरुस्तीसाठी मदत, जनावरांच्या मृत्यूची नुकसानभरपाई, पिकांची नुकसानभरपाई, शाळांना नुकसानभरपाई योग्य त्या प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. ही जबाबदारी सरकारचीच आहे. कृष्णा नदी व तिच्या उपनद्यांवर महाराष्ट्रात असणाºया सर्व धरणांबाबत तसेच कर्नाटकमधील हिप्परगी व अलमट्टी या धरणांमध्ये करावयाचा पाणीसाठा व विसर्ग याबाबत राष्ट्रीय जल आयोगाने निश्चित नियमावली बनविण्याची आवश्यकता आहे व त्याचे दोन्ही राज्यांनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे. निदर्शनामध्ये आप च्या युवा आघाडीचे संदीप सोनवणे, कोथरूड अध्यक्ष अभिजित मोरे, शहर सहसचिव पैगंबर शेख,  संदेश दिवेकर, किशोर मुझुमदार, निखिल देवकर ,मोहनसिंग रजपूत , प्रणित तावरे, तगतसिंग तनवर, सुहास पवार,फ्रँकी मेंडोसे, रिक्षा युनियनचे केदार ढमाले, असिफ मोमीन सहभागी झाले होते. 

टॅग्स :PuneपुणेSangliसांगलीSatara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूरfloodपूर