शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

लम्पी आजाराच्या साथीकडे सरकारचे दुर्लक्ष; राजू शेट्टी यांची उच्च न्यायालयात धाव

By नम्रता फडणीस | Updated: October 11, 2022 18:16 IST

गायी-म्हशींसारख्या पाळीव जनावरांसाठी ‘लम्पी’ आजार जीवघेणा ठरतोय

पुणे : गायी-म्हशींसारख्या पाळीव जनावरांसाठी ‘लम्पी’ आजार जीवघेणा ठरत आहे. तरीही, या त्वचा आजाराच्या साथीकडे सरकार व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

या याचिकेत राज्याचा पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग, पशुसंवर्धन आयुक्तालय, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था पुणे, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषद आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांच्यासह मलकापूर तालुक्यातील भालेगावचे सरपंच तेजस घुले पाटील, नगरमधील सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख, सांगली जिल्ह्यातील शेतकरी संपतराव पवार यांनी शेतकऱ्यांचे व्यापक जनहित लक्षात घेऊन अॅड. असीम सरोदे, अॅड. तृणाल टोणपे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. अजिंक्य उडाणे, अॅड. अक्षय देसाई यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

राज्यात ‘लम्पी’ आजाराचे संक्रमण वेगाने होत असून, मोठ्या प्रमाणात गायी, म्हशी व दूध देणारी जनावरे मरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या आजाराच्या भयानकतेकडे सरकारने नीट लक्ष दिले नसून, बेजबाबदार पद्धतीने केवळ घोषणा केल्या जात असल्याचे निरीक्षण याचिकेत मांडण्यात आले आहे.

''जनावरांसाठी प्राणघातक ठरणाऱ्या आणि शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान करणाऱ्या ‘लम्पी’ आजारावर सरकारने तत्काळ उपाययोजना राबविण्याची गरज आहे. पशु हक्कांचे संरक्षण करणे हे राज्यघटनेचे मूल्य असून, त्यासाठी आम्ही ही याचिका दाखल केली आहे. - अॅड. असीम सरोदे, याचिकाकर्त्यांचे वकील''

याचिकेतील मागण्या

- प्राण्यांमधील साथींचे आजार प्रतिबंध व नियंत्रण कायद्यानुसार यंत्रणा उभारण्यात यावी.- पशुवैद्यकीय तज्ज्ञांसाठी आदर्श कार्यप्रणाली करण्यात यावी.- पशुवैद्यकीय शास्त्रात पदवी व पदविकाधारक डॉक्टरांना ‘लम्पी आजार योद्धे’ म्हणून अधिकार, सुविधा व संरक्षण द्यावे.- पशुवैद्यकीय शिक्षणाच्या पदविका अभ्यासक्रमात बदल करावेत.- लम्पी आजाराने मृत झालेल्या प्रत्येक गायी-गुरांसाठी दीड लाख रुपये भरपाई द्यावी.- ‘लम्पी’ आजाराच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे असावेत, यासाठी सरकारने पावले उचलावीत.- पाळीव प्राण्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीdoctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारSocialसामाजिकFarmerशेतकरी