शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

"सरकार म्हणजे लबाडाघरचं जेवण"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 1:11 AM

राज्यातील आणि देशातील सरकार हे शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

शेटफळगढे : राज्यातील आणि देशातील सरकार हे शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. भाजपा सरकारच्या आश्वासनांना पुन्हा फसू नका आपल्याकडे एक म्हण आहे, ‘लबाडाघरचं जेवण जेवल्याशिवाय काही खरं नाही,’ तसं हे सरकार आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला.पोंधवडी (ता. इंदापूर) येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा झाली त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी मंचावर आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, अभिजित तांबिले, हनुमंत बंडगर, यशवंत माने, सरपंच राणी बंडगर, उपसरपच मीरा भोसले, सदस्य सचिता बंडगर, बाळासाहेब खारतोडे, तुळशीराम खारतोडे, तुकाराम बंडगर, महेश शेंडगे आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, की हे सरकार नुसते आश्वासन देते. पूर्तता करत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणाले, दिली का कर्जमाफी, हे सरकार फक्त थापा मारत आहे. आज साखर उचलली जात नाही. त्यामुळे साखर कारखानदारीसह शेतकरी अडचणीत आहे.एकीकडे हजारो कोटी कर्ज घेऊन उद्योगपती फरार झाले आहेत. शेतकरी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात असताना त्यांना मदत करणे गरजेचे आहे. मात्र अशा वेळी दुधाला दिले जाणारे अनुदान बंद केले. पाण्याचे नियोजन नाही त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांची वीजच कमी केली. त्यावर मी आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांना यांना भेटून दिवसा आठ तास व रात्री दहा तास वीज देण्याचे नियोजन केले.आपल्या भागात एकही नवीन प्रकल्प या सरकारच्या काळात आला नाही. उलट आपल्या येथे असलेला कागद प्रकल्प अडचणीतून मार्ग काढत आहे. भाजपाच्या सरकारच्या काळात समाजातील कोणताच घटक समाधानी नाही. त्याचबरोबर राज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत यांच्या आरक्षणाचे प्रश्न सोडवले नाहीत. केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच करत नाहीत. आता धनगर समाजालाही पुन्हा वेगळे सांगून फसविण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे यांच्या खोट्या आमिषाला बळी न पडता येणाºया निवडणुकात सरकार उलथून पाडा, असेही आवाहन पवार यांनी यावेळी केले. माजी सरपंच नानासाहेब बंडगर यांनी प्रास्ताविक केले.>इंदापूरकरांना जॅकेटचा लय नाद...दरम्यान, या कार्यक्रमाला पोंधवडीचे माजी सरपंच नानासाहेब बंडगर यांनी जॅकेट घातले होते. यावर अजित पवार यांनी बोलताना इंदापूरकरांना जॅकेटचा लयच नाद आहे, असे म्हणताच हशा पिकला. या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना चिमटा काढण्यास पवार विसरले नाहीत, अशी चर्चा कार्यक्रमानंतर रंगली होती. त्यामुळे यंदा हर्षवर्धन पाटील व अजित पवार यांची जुगलबंदी रंगणार, असे चित्र स्पष्ट झाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार