शहरात २७ नोव्हेंबरपासून ‘गोवर आणि रुबेला’ लसीकरण मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 14:06 IST2018-10-12T13:57:40+5:302018-10-12T14:06:59+5:30
शहरातील सर्व शाळां, खाजगी, इंग्रजी, कॉन्व्हेन्ट, मिशनरी, अल्पसंख्यांक शाळांमध्ये देखील ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

शहरात २७ नोव्हेंबरपासून ‘गोवर आणि रुबेला’ लसीकरण मोहीम
पुणे: गोवर आणि रुबेला हा विषाणूजन्य आजार अतिशय घातक आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने येत्या २७ नोव्हेंबर पासून संपूर्ण शहरात ‘गोवर रुबेला’ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ९ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे या राष्ट्रीय लसीकरण मोहिमे यशस्वी करण्यासाठी व शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी शहरातील सर्व संस्था, हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी येथे केले.
याबाबत आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, भारत सरकारने सन २०१८ सालांपर्यंत रुबेला आजाराचे संपूर्ण देशातून निर्मूलन व या आजारावर नियंत्रण करण्याचे ठरवले आहे. हे लसीकरण केवळ ९ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांसाठी असून, यापूर्वी लसीकरण झाले असले तरी देखील पुन्हा लसीकरण करणे आवश्यक आहे. ९ ते १५ वयोगटातील ६० त ६५ टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत. त्यामुळे २७ नोव्हेंबर पासून सुरु झालेली लसीकरण मोहीम किमान एक ते सव्वा महिना सुरु राहणार आहे. शहरात पोलिओ अन्य लसीकरण होणा-या ठिकाणी, अंगणवाडी केंद्रांमध्ये ही लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामकृष्ण हंकारे यांनी स्पष्ट केले. शहरातील सर्व शाळां, खाजगी, इंग्रजी, कॉन्व्हेन्ट, मिशनरी, अल्पसंख्यांक शाळांमध्ये देखील ही मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संस्थांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
...............