शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

गुळाणीतून बेसुमार पाणीउपसा

By admin | Updated: June 9, 2015 05:16 IST

गुळाणी (ता.खेड) येथील जनतेला सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

वाफगाव : गुळाणी (ता.खेड) येथील जनतेला सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहेत. या गावात नळपाणी पुरवठ्याची नवीन योजना मागील वर्षीच पूर्ण झाली. त्यासाठीची विहिर देखील पाझर तलावामध्येच आहे. तरी देखील विहिरीत पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत.गुळाणी येथे १९९७ साली छोटे पाटबंधारे विभागामार्फत पाझर तलावाचे काम सुरू झाले व २००५ मध्ये पूर्ण करण्यात आले. परंतु, अद्यापही पाझर तलावाची दप्तरी नोंद झालेली नाही. अजूनही ७/१२ वर मुळ खातेदारांचीच नावे आढळतात. या तलावातून शेतीसाठी पाणी उपसण्याची कुणालाही परवानगी नाही. तरीही स्थानिक शेतकरी कुणालाही न जुमानता तलावातून इलेक्ट्रीक मोटार, इंजिन आदींच्या सहाय्याने राजरोसपणे पाणी उपसतात. त्यामुळे हा पाझर तलाव गेल्या दोन महिन्यांपासून कोरडा पडला आहे. म्हणून गुळाणी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. पाणी उपसा करणा-यांना गुळाणी ग्रामपंचायतीने वारंवार सांगूनही त्यांनी पाण्याचा उपसा बंद न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. गुळाणी ग्रामपंचायतीने तलावातील पाणी उपसा बंद करण्याबाबत तहसिल कार्यालयाशी पत्रव्यवहार करूनही संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले. (वार्ताहर)४गुळाणी तलावातून शेतीसाठी पाणी उपसण्याची कुणालाही परवानगी नाही. तरीही स्थानिक शेतकरी कुणालाही न जुमानता तलावातून इलेक्ट्रीक मोटार, इंजिन आदींच्या सहाय्याने राजरोसपणे पाणी उपसतात. ४गुळाणी ग्रामस्थांना सध्या पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दर दर वर्षी शेतीसाठी या तलावातून बेसुमार पाणी उपसा होत आहे. यावर नियंत्रण येण्यासाठी पाझर तलावाची नोंद ७/१२ वर व्हावी व शासनाचे नियंत्रण असावे, अशी मागणी होत आहे.