शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
3
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
4
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
5
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
6
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
7
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
8
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
9
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
10
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
11
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
12
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
13
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
14
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
15
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
16
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
17
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
18
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
19
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
20
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
Daily Top 2Weekly Top 5

मकोका कारवाईनंतर तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गजाआड; वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई

By नितीश गोवंडे | Updated: June 30, 2025 15:32 IST

दरोड्याच्या गुन्ह्यात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातही गौडसह साथीदारांविरोधात मकोका कारवाई करण्यात आली होती

पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर गेले तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईताला वारजे पोलिसांनीअटक केली. आकाश सिब्बन गौड (२३, रा. .शिवणे, मूळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरोधात वारजे माळवाडी आणि मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

गौड आणि साथीदारांनी ५ ऑक्टोबर २०२२ रोजी क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून शुभम मानकर याच्यावर कोयत्याने वार केले होते, तसेच त्याला दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गौड याच्यासह साथीदारांविरोधात वारजे पोलिसांनी मकोका कारवाई केली होती. दरोड्याच्या गुन्ह्यात मार्केट यार्ड पोलिस ठाण्यातही गौडसह साथीदारांविरोधात मकोका कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतर गौड पसार झाला होता.

पसार झालेल्या गौडचा शोध घेण्यासाठी वारजे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गेले होते. त्याच्या नातेवाईकांसह मित्रांकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा गौड तेलंगणा वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. तो वास्तव्याचे ठिकाण सातत्याने बदलत होता. गौड हा वारजे-एनडीए रस्त्यावर असलेल्या शिवणे भागात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे यांना २६ जून रोजी खबऱ्याने दिली. त्यानंतर शिवणे भागातील मैदानावर सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले.

अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, एसीपी भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नरळे, पोलिस कर्मचारी सागर कुंभार, गणेश शिंदे, योगेश वाघ, अमित शेलार, बालाजी काटे, निखिल तांगडे, शरद पोळ, अमित जाधव, अमोल झणझणे आणि गोविंद कपाटे यांनी ही कामगिरी केली.

गुन्हे शाखेकडून फरार गुंड अटकेत..

मकोका कारवाईनंतर फरार झालेल्या कात्रज भागातील सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. रुपेश राजन केंद्रे (१९, रा. सच्चाईमाता मंदिराजवळ, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आंबेगाव पोलिसांनी केंद्रे आणि साथीदारांविरोधात मकोका कारवाई केली होती. कारवाईनंतर तो फरार झाला होता. तो कात्रज भागात आल्याची माहिती उज्ज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, मोकाशी, कुंभार, शंकर नेवसे, संजय जाधव आणि निखिल जाधव यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकCourtन्यायालय