शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पात चांगला पाऊस

By admin | Updated: June 27, 2017 07:44 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या ५ धरणांच्या पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या ५ धरणांच्या पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सर्व धरणे मिळून ४२७ द.ल.घ.फूट उपुयक्त पाणी आलेले आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये गेल्या आठवड्यात २.३६ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. आता आजअखेर ३.४० टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्व धरणांच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आज पर्यंत ४२३ मिमी पाऊस झाला आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी दिली.कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यात येडगाव, माणिकडोह, वडज , पिंपळगाव जोगा आणि चिल्हेवाडी ही ५ धरणे, तर आंबेगावमध्ये आंबेगाव तालुक्यात डिंभा ही धरणे आहेत. १ जूनपासून जुन्नर तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली होती. पण, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी वाढलेली नव्हती. सर्व धरणांमध्ये गेल्या आठवड्यात अवघे ६१६ द.श.घ.फूट उपयुक्त पाणीसाठी उपलब्ध होता. दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे ४२३ द.ल.घ.फूट उपुयक्त पाणीसाठा वाढला आहे. गेल्या वर्षी आज दिवसाअखेर फक्त १४५ द.ल.घ.फूट पाणीसाठा (०.४७ टक्के) उपलब्ध होता. सर्व धरणांमध्ये पाणीसाठा वाढत असताना पिंपळगाव जोगा धरणात पाणीसाठा वाढलेला नाही. या धरणाचा पाणीसाठा ० टक्केच आहे. मात्र, या धरणात कालचा पाऊस ७३ मिमी, तर १ जूनपासून आज अखेर १६० मिमी झाला असल्याने पाणीसाठा वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.जुन्नर तालुक्यातील पाच धरणांतील उपयुक्त पाणीसाठा व टक्केवारी, तसेच १ जून २०१७ पासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाचे प्रमाण पुढीलप्रमाणे - येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये २७४ द.ल.घ.फूट (९.७९ टक्के) आहे. नव्याने ८ द.ल.घ.फुट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. रविवारी दिवसभरात ७० मि.मी.पाऊस झाला आहे, तर १ जूनपासून आजअखेर २३४ मिमी पाऊस या धरणक्षेत्रात झालेला आहे. माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ४४७ द.ल.घ.फूट (४.४० टक्के) आहे, नव्याने १५५ द.ल.घ.फूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. काल दिवसभरात ९४ मिमी पाऊस झाला आहे, तर १ जूनपासून आजअखेर १५२ मिमी पाऊस या धरणक्षेत्रात झालेला आहे. वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये २७ द.ल.घ.फूट (२.३४ टक्के) आहे, नव्याने ३ द.ल.घ.फूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, १ जूनपासून १५९ मिमी पाऊस या धरणक्षेत्रात झालेला आहे.