विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरु होतोय 'योगा' हा नवा अभ्यासक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 06:10 PM2021-06-21T18:10:33+5:302021-06-21T18:11:00+5:30

'बेसिक्स ऑफ योगा ऑनलाईन कोर्स' ला सुरुवात: योग दिवसाचे औचित्य साधत या अभ्यासक्रमाची घोषणा

Good news for students! A new course is starting in Pune University this academic year | विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरु होतोय 'योगा' हा नवा अभ्यासक्रम

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरु होतोय 'योगा' हा नवा अभ्यासक्रम

Next
ठळक मुद्देशैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. ६० तासांचा हा अभ्यासक्रम यशस्वी रित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट मिळणार.

पुणे: योग शिक्षणातील मूलभूत माहिती देणारा 'बेसिक्स ऑफ योगा' या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात योग दिवसाचे औचित्य साधत या अभ्यासक्रमाची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर यांनी केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, आयुष मंत्रालयातील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन, आंतरराष्ट्रीय योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद, आदी उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून व पारंपरिक ज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र यांची सांगड घालत हा अभ्यासक्रम तयार केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ शिक्षणाबरोबरच शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी हा योग अभ्यास उपयुक्त ठरेल. असेही करमळकर यांनी सांगितले आहे.

 डॉ.अपूर्वा पालकर म्हणाल्या, हा अभ्यासक्रम योग विषयातील मूलभूत गोष्टींची माहिती देणारा संपूर्णपणे ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. ६० तासांचा हा अभ्यासक्रम यशस्वी रित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट मिळणार आहेत.

मन, शरीर व भावना यांच्यात समतोल साधायचा असेल तर योग आवश्यक

मन, शरीर व भावना यांच्यात समतोल साधायचा असेल तर योग आवश्यक आहे. स्वतःला ओळखून आपण आहोत तसे स्वीकारण्याची शक्ती ही योग साधनेतून मिळते तसेच शिकण्याचा आनंद जागृतही ठेवता येतो. असे डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले आहेत. 

Web Title: Good news for students! A new course is starting in Pune University this academic year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.