शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

गुड न्युज! यंदा लवकरच मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, पुण्यात १२, १३ व १४ जूनला मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 21:28 IST

साधारणपणे १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पोहचतो. विदर्भात ५ दिवस अगोदर आगमन

ठळक मुद्देपुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी १२, १३ व १४ जूनला हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे

पुणे: नैऋत्य मोसमी पावसाने गुरुवारी आणखी पुढे वाटचाल केली असून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सून साधारणपणे १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पोहचतो. यंदा त्याने ५ दिवस अगोदर महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सून आज सुरत, नंदुरबार, बेतुल, मंडला, बिलासपूर, बोलांगीर, पुरीपर्यंत पोहचला आहे. 

उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र कायम असल्याने महाराष्ट्रातील कोकण तसेच गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्यात मुसळधार पाऊस पडला. कोकणात पुढील चार दिवस तसेच विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासात मुंबई (सांताक्रूझ) २३०, बेलापूर १७०, पनवेल १६०, उल्हासनगर १५०, कल्याण १४०, माथेरान १२०, भिवंडी, पालघर, उरण, वसई ११०, अंबरनाथ, रोहा १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील धुळे ९०, महाबेळश्वर ५०, ओझरखेडा ४०, एरंडोल, वेल्हे २० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील परभणी ७०, अंबड, परतूर ६०, परळी वैजनाथ ५० मिमी पाऊस झाला. विदर्भातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. घाटमाथ्यावरील लोणावळा (टाटा) १५०, ताम्हिणी ९०, डुंगरवाडी ८०, शिरगाव ७०, दावडी, खोपोली ६०, कोयना(पोफळी), अम्बोणे, वळवण, भिरा येथे ५०मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गुरुवारी दिवसभरात सांताक्रूझ ४७, कुलाबा १०, डहाणु ६१, महाबळेश्वर९, चंद्रपूर १२, अमरावती २६, गोंदिया १०, वर्धा ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती कायम असल्याने पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील चार दिवस येलो अलर्ट देण्यात आला असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी १२, १३ व १४ जूनला हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भात आता मॉन्सून पोहचला असून बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील द्रोणीय स्थिती याचा एकत्रित परिणाम होऊन विदर्भातील गोंदिया, गडचिरोली,  नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोकण व विदर्भात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईkonkanकोकणRainपाऊस