पुणे : सलग सुट्ट्यांमुळे रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढली असून, ही वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे आणि नागपूरदरम्यान विशेष शुल्कासह विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून, गाडी क्रमांक ०१४६७ आणि ०१४६८ पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट विशेष गाडीची प्रत्येकी एक फेरी होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
गाडी क्रमांक ०१४६७ पुणे-नागपूर विशेष गाडी शुक्रवारी (दि. २३) दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी पुणे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता नागपूर येथे पोहोचेल, तर गाडी क्रमांक ०१४६८ नागपूर-पुणे विशेष गाडी शनिवारी (दि. २४) सकाळी ८ वाजता नागपूर येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता पुणे येथे पोहोचेल.
या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे दिले आहेत. या गाडीला दोन वातानुकूलित २-टायर, चार वातानुकूलित ३ -टायर, आठ स्लीपर क्लास, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन आणि एक गार्ड ब्रेक व्हॅन आहे.
Web Summary : Central Railway introduces a special Pune-Nagpur-Pune superfast train due to increased passenger traffic during continuous holidays. The train will run one round trip, providing relief to travelers with stops at key stations.
Web Summary : मध्य रेलवे ने छुट्टियों में यात्रियों की भीड़ को देखते हुए पुणे-नागपुर-पुणे सुपरफास्ट विशेष ट्रेन शुरू की है। यह ट्रेन एक फेरा लगाएगी और यात्रियों को प्रमुख स्टेशनों पर स्टॉपेज प्रदान करेगी।