प्रवाशांसाठी खुश खबर..! पुणे विभागात नव्याने दहा लालपरी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:32 IST2025-05-06T15:30:43+5:302025-05-06T15:32:03+5:30
स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर, दौंड या चार विभागाला दहा बस देण्यात आले होते.

प्रवाशांसाठी खुश खबर..! पुणे विभागात नव्याने दहा लालपरी दाखल
पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाला नव्याने दहा लालपरी मिळाल्या आहे. आतापर्यंत पुणे विभागाला ५० नव्या लालपरी मिळाल्या असून, स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर, दौंड या चार विभागाला दहा बस देण्यात आले होते.
आता नव्याने आलेल्या दहा बस नारायणगाव आगाराला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून एसटीने प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
एसटी महामंडळात नव्या लालपरी दाखल होत आहेत. टप्प्याटप्प्याने बस दाखल झाल्यानंतर त्या बस प्रत्येक विभागाला देण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या गर्दीच्या काळात नव्या बस ताफ्यात दाखल झाल्याने प्रवाशांना सोयीचे होणार आहे.
शिवाय भविष्यात अजून पुणे विभागाला अजून १५० बस दाखल होणार आहेत. त्यामुळे पुणे विभागातील बसची संख्या वाढणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.