शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी...! पुण्यातून उन्हाळी सुटीनिमित्त धावणार ४५० जादा बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:45 IST

- पुण्यातून कोल्हापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोकण मार्गावर बस

पुणे : उन्हाळी सुट्या सुरू झाल्यावर पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे पुणे एसटी विभागातून कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोकण यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांना एसटीचा प्रवास सुखकर आणि वातानुकूलित व्हावा, यासाठी पुणे एसटी विभागाकडून (दि. १५) एप्रिल ते जूनपर्यंत ४५० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या बस दि. १५ जूनपर्यंत धावणार आहेत.

राज्यातील इतर भागातून तसेच बाहेरील राज्यातील लाखो नागरिक नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्या सुरू होताच गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले जाते. त्यासाठी महिन्याभरापासूनच रेल्वे, एसटी यासह खासगी बसचे सीट आरक्षित केले जाते. मात्र, ज्या कुटुंबीयांचे नोकरीच्या ठिकाणी सुट्या किंवा अन्य कारणांमुळे चार ते आठ दिवस आधी बाहेरगावी जायचे नियोजन होते. अशावेळी रेल्वेचे बुकिंग फुल्ल असते, तर एसटीलाही प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येऊ नये, यासाठी बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पुणे एसटी विभागाकडून १५ एप्रिल ते १५ जूनदरम्यान जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत

दरवर्षी शाळांच्या परीक्षा १० ते १२ एप्रिलपर्यंत संपतात. त्यानंतर नागरिकांचे बाहेरगावी जाण्याचे नियोजन होते. मात्र, यंदा परीक्षांचे वेळापत्रक बिघडले आणि २५ एप्रिलपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहेत. त्यामुळे आगारात प्रवाशांची गर्दी २५ एप्रिलनंतर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तीनशे ते पाचशे जादा बस

स्वारगेट आगारातून बोरिवली, ठाणे, दादर, सोलापूर, कोल्हापूर, कल्याण, पंढरपूर, तर पुणे स्टेशन आगारातून दादर, तर शिवाजीनगर आगारातून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, धुळे, अकोला, सोलापूर, भीमाशंकर, बोरिवली या मार्गावर नियमित बस धावतात. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये चारशे ते पाचशे जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले जाते. त्यानुसार यंदाही प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा बस सोडण्यात येणार आहेत. 

प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातून जादा बस सोडण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करण्यापेक्षा सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी एसटीचा लाभ घ्यावा.  - अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune to Run 450 Extra Buses for Summer Vacation

Web Summary : Pune ST to run 450 extra buses from April 15th to June 15th for summer vacation travelers. This will cover routes to Kolhapur, Solapur, Nashik, Mumbai, and Konkan, easing travel during peak season.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी