उन्हाने त्रस्त भारतीयांसाठी आनंदाची बातमी; यंदा देशाच्या ८० टक्के भागात १०६ टक्के पावसाचा अंदाज

By श्रीकिशन काळे | Published: April 15, 2024 03:34 PM2024-04-15T15:34:52+5:302024-04-15T15:35:48+5:30

गेल्या वर्षी आम्ही ९६ टक्के पावसाचा अंदाज दिला होता आणि ९४ टक्के पावसाची नोंद झाली

Good news for heat-stricken Indians; This year, 106 percent rainfall is expected in 80 percent of the country | उन्हाने त्रस्त भारतीयांसाठी आनंदाची बातमी; यंदा देशाच्या ८० टक्के भागात १०६ टक्के पावसाचा अंदाज

उन्हाने त्रस्त भारतीयांसाठी आनंदाची बातमी; यंदा देशाच्या ८० टक्के भागात १०६ टक्के पावसाचा अंदाज

पुणे : यंदा देशात गतवर्षीपेक्षा अधिक चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गतवर्षी ९६ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला होता, तेव्हा ९४ टक्के पाऊस झाला. आता यंदा ला निनो मॉन्सूनमध्ये सक्रिय होईल आणि त्यामुळे या वेळी १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. ही देशासाठी अतिशय आनंदवार्ता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशात ८० टक्के भागांत सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज आहे, असेही ते म्हणाले.

हवामान विभागाचे यंदाच्या मॉन्सूनचा पहिला अंदाज सोमवारी (दि.१५) जाहीर केला. महोपात्रा यांनी देशभरातील मॉन्सूनची स्थिती कशी असेल, कोणत्या राज्यांमध्ये चांगला पाऊस आणि कुठे कमी पाऊस होईल, याचा अंदाज दिला. एकूणच यंदा देशभरात सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

महोपात्रा म्हणाले, आम्ही अनेक आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन देशभरात हवामान अंदाजासाठी मशीन बसविलेल्या आहेत. त्याच्या संशोधनावरून आज आम्ही अंदाज देत आहोत. गेल्या दोन वर्षामध्ये बिहार, ओडिसा, पं. बगाल आदी राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. यंदा देखील या भागात तशीच अवस्था असणार आहे. खरंतर भारतीय मॉन्सून हा अतिशय किचकट असतो आणि स्थानिक पातळीवरील वातावरणाचा पावसाचा खूप परिणाम होतो. त्यामुळे या भागांमधील कमी पावसाच्या अंदाजाबाबत ठोस कारणे आम्ही सांगू शकत नाहीत.’’

‘या वर्षी १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. गेल्या वर्षी आम्ही ९६ टक्के पावसाचा अंदाज दिला होता आणि ९४ टक्के पावसाची नोंद झाली. आता यंदा मॉन्सूनमधील प्रत्येक महिनावार पावसाचा अंदाज आम्ही मे अखेरच्या बुलेटिनमध्ये देऊ. मॉन्सूनच्या पहिल्या टप्प्यात खूप पाऊस होणार नाही. दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे.

वादळाची शक्यता नाही !

मॉन्सूनपूर्व पाऊस हा निवडणूकीवर काही परिणाम करू शकतो का ? याविषयी महोपात्रा म्हणाले, या काळात कोणतेही वादळ येण्याची शक्यता नाही. पण उष्णतेची लाट येऊ शकते. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. उष्णतेच्या लाटेविषयी सरकारला सूचना दिलेल्या आहेत. आम्ही निवडणूक काळात सातत्याने निवडणूक आयोगाला अपडेट देत राहणार आहोत.’’

सध्या एल निनो जात आहे आणि ला निनो येत आहे. नऊ वर्षांच्या आकडेवारीवरून ला निनोमुळे चांगला पाऊस झाल्याची स्पष्ट होत आहे. यंदाही चांगला पाऊस होईल. तसेच इंडियन ओशेन डायपोलची परिस्थिती ही सध्या न्यूट्रल आहे. आपल्या माॅन्सूनसाठी सकारात्मक स्थिती असणार आहे. - डॉ. मृत्यूंजय महोपात्रा, महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग

या ठिकाणी कमी पाऊस !

देशातील ८० भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मिर, हिमाचाल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, पं. बंगाल या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. इतर सर्व राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

Web Title: Good news for heat-stricken Indians; This year, 106 percent rainfall is expected in 80 percent of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.