शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

चांगल्या वाईटाची ’सेन्सॉरशिप’ करता आली पाहिजे : जावेद सिद्दीकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 6:17 PM

इंटरनेट, वेब सिरीजवरची भाषा त्या ठिकाणी योग्यच आहे. पण त्याचा दर्जा घसरून चालणार नाही...

ठळक मुद्देडेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये ' समाजाची बदलती भाषा ' या विषयावर परिसंवाद

पुणे :  लेखन हे सर्वसामान्य  आणि अभिरूचीसंपन्न वाचक या दोहोंसाठी असावं. मात्र जे लिहिलं जाईल ते चांगलंच असलं पाहिजे. लेखनाचा दर्जा ढासळता कामा नये. आपल्याला स्वत:लाच चांगल्या -वाईटाची सेन्सॉरशिप करता आली पाहिजे. त्यासाठी वेगळी समिती असली तरच ऐकू, असे वाटता कामा नये. वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चांमधील व्यक्ती एकमेकांचे ऐकू शकत नाहीत, तर, आपण ते  कसे ऐकू शकणार ? असा सवाल ज्येष्ठ संवाद लेखक जावेद सिद्दीकी यांनी उपस्थित केला. डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये ' समाजाची बदलती भाषा ' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये पत्रकार विजय चोरमारे, सचिन चपळगावकर, अ‍ॅड. सुजाता पाठक, शॉर्ट फिल्म दिग्दर्शक श्रावण खरात सहभागी झाले होते. सिद्दीकी म्हणाले, ' भाषा बदलत आहे, पण ती अशीच बदलली पाहिजे का ? याचा विचार केला पाहिजे. म्हणी, वाक्प्रचार, जुन्या कथाची पखरण असलेली  भाषा आपण विसरलो आहोत. एसएमएस ची नवीच भाषा जन्माला आली आहे. इंटरनेट, वेब सिरीजवरची भाषा त्या ठिकाणी योग्यच आहे. पण त्याचा दर्जा घसरून चालणार नाही. सतत बदलली जाणारी भाषा जपलीच पाहिजे पण कंटेट सांभाळणे जास्त आवश्यक आहे. 'आपल्या भाषेवर इतिहास, भूगोलाची छाप असते. भाषा बदलत गेली तरी लेखकाची जबाबदारी बदलत नाही. भाषांना वाचविण्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल. चपळगावकर यांनी समाज माध्यमांची,राजकारण्यांची भाषा ही प्रभाव टाकत असते. टीआरपीची भाषा ही समाज संस्कृती जपणारी नसल्याकडे लक्ष वेधले. सुजाता पाठक म्हणाल्या, ' नाटकांची वाक्ये आता पल्लेदार नसतात, तर तुटक असतात. समाजाचेच प्रतिबिंब नाटकात पडत असते.श्रावण खरात यांनी  'इंटरनेट वर चित्रपट करताना बंधने नसली, तरी स्वत:वर स्वत:ची बंधने घालून घेणे हितकारक ठरत असल्याचे नमूद केले. 

संयोजक मोनिका सिंग यांनी सर्वांचा सत्कार केला. आर जे तरुण यांनी सूत्रसंचालन केले.----------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेWebseriesवेबसीरिजInternetइंटरनेटcinemaसिनेमाliteratureसाहित्य