वाकडमध्ये 38 ताेळे साेन्याची चाेरी ; संशयित सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 14:31 IST2018-09-10T13:22:21+5:302018-09-10T14:31:04+5:30

वाकड येथील गृहसंस्थेत एका चाेरट्यांने तब्बल 38 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाेलीस अाराेपीचा शाेध घेत अाहेत.

gold stolan at wakad, suspect catched in cctv | वाकडमध्ये 38 ताेळे साेन्याची चाेरी ; संशयित सीसीटीव्हीत कैद

वाकडमध्ये 38 ताेळे साेन्याची चाेरी ; संशयित सीसीटीव्हीत कैद

पिंपरी : वाकड येथील एका गृहसंस्थेत एका चोरट्याने तब्बल 38 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्हीमध्ये संशयित चोरटा दिसून येत आहे. पोलिसांनी हे फुटेज समाजमाध्यमांमधून लोकांपर्यंत पोहोचवले असून या चोरट्याला कोणी ओळखत असेल तर तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वाकड पोलिसांनी केले आहे. 

वाकड हद्दीत घरफोडी करणारा संशयित चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. चोरी करतानाचे त्याचे फुटेज नसले तरी सोसायटीच्या आवारात जाताना, लिफटमधून खाली येत असताना,रस्त्यावर आल्यानंतर संशयितरित्या वावरताना तो दिसून येत आहे. त्यानेच 38 लाखाचे दागिने पळविले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रेखाचित्र प्रकाशित करण्याऐवजी त्याचा व्हिडीओ पोलिसांनी नागरिकांच्या विविध व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर पाठवला आहे. चोरट्याविषयी नागरिकांकडून माहिती मिळावी,अशी अपेक्षा पोलिसांना आहे. नागरिकांकडून या चोरट्याबद्दल मरहिती मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरिश माने यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title: gold stolan at wakad, suspect catched in cctv