शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शेतात शेळ्या चारणाऱ्या महिलेचे हातपाय बांधुन दागिन्यांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 7:40 PM

टॉवेलने हातपाय बांधुन चाकुचा महिलेच्या अंगावरील सुमारे ३२ हजार रुपये किंमतीचे दागिने दोघा चोरट्यांनी नेले.

ठळक मुद्देशहरात भर दिवसा घडला प्रकार

बारामती : शेतात शेळ्या चारणाऱ्या महिलेचे टॉवेलने हातपाय बांधुन चाकुचा धाक दाखवुन तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावुन नेण्याचा प्रकार बारामती शहरातील बोरावके वस्ती येथे घडला. या महिलेच्या अंगावरील सुमारे ३२ हजार रुपये किंमतीचे दागिने दोघा चोरट्यांनी नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. शहरात भर दिवसा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. उषा संभाजी कांबळे (वय ४०, रा.बोरावकेवस्ती शिवाजीनगर कसबा बारामती ता. बारामती जि.पुणे ) या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि ११) दुपारी २.३० दरम्यान  बारामती शहरातील बोरावके वस्ती शिवाजीनगर कसबा हेंमत गरगटे यांच्या शेतात उषा कांबळे शेळ्या चारत होत्या. शेळया चारीत असताना दोन अनोळखी युवक त्या ठिकाणी आले. त्यांनी कांबळे यांचे हातपाय टॉवेलने बांधले. तसेच चाकुचा धाक दाखवुन, बळजबरीने त्यांच्या  कानातील कर्णफुले, गळयातील मनी मंगळसूत्र व पायातील चांदीच्या पट्या व मोबाईल असा सुमारे ३२ हजार रुपये किंमतीचा ऐवज जबरीने हिसकावून चोरून नेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश अस्वर करीत आहेत.       

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस