Pune: नाश्ता करताना सोन्याची चेन, मोबाइल, लॅपटॉप लंपास; रेल्वे स्टेशन आवारातील घटना

By नम्रता फडणीस | Updated: March 4, 2024 18:43 IST2024-03-04T18:42:43+5:302024-03-04T18:43:07+5:30

३ मार्च रोजी पहाटे नाश्ता करण्यासाठी पुणे रेल्वेस्थानकासमोरील गुड बेकरी येथे थांबले होते....

Gold chains, mobiles, laptops lumped during breakfast; Incidents in Railway Station premises | Pune: नाश्ता करताना सोन्याची चेन, मोबाइल, लॅपटॉप लंपास; रेल्वे स्टेशन आवारातील घटना

Pune: नाश्ता करताना सोन्याची चेन, मोबाइल, लॅपटॉप लंपास; रेल्वे स्टेशन आवारातील घटना

पुणे : कंपनीच्या कामानिमित्त दिल्लीला निघालेल्या एकाची सोन्याची चेन, मोबाइल, लॅपटॉप असा लाख ४४ हजारांचा मुद्देमाल रेल्वेस्थानकासमोरून पळवून नेल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी यशराज देशमुख (वय २९, रा. इचलकरंजी) यांनी बंड गार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी यशराज देशमुख हे कंपनीच्या कामानिमित्त रेल्वेने दिल्ली येथे जात होते.

३ मार्च रोजी पहाटे नाश्ता करण्यासाठी पुणे रेल्वेस्थानकासमोरील गुड बेकरी येथे थांबले होते. यावेळी चोरट्याने फिर्यादी यांची सोन्याची चेन, मोबाइल, लॅपटॉप असा १ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सहायक पोलिस निरीक्षक संदीप मधाळे तपास करत आहेत.

Web Title: Gold chains, mobiles, laptops lumped during breakfast; Incidents in Railway Station premises