शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

भोर, वेल्ह्यातील दुर्गम शाळांना शिक्षक द्या, स्थायी सभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 00:39 IST

पुणे जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षक नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भोर तालुक्यात १०४ शाळांमध्ये अद्यापही शिक्षक रुजू झाले नाहीत, तर वेल्हे तालुक्यातील ९० शाळांवर शिक्षक रुजू झालेले नाहीत

पुणे : जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षक नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भोर तालुक्यात १०४ शाळांमध्ये अद्यापही शिक्षक रुजू झाले नाहीत, तर वेल्हे तालुक्यातील ९० शाळांवर शिक्षक रुजू झालेले नाहीत. यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. या शाळेवर शिक्षक नेमण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही केवळ मुळमुळीत उत्तरे दिली जातात. येत्या दोन दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी सर्व सभासदांसोबत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिला.जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी सभागृहात अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २१) स्थायी समितीची बैठक पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रगोत्री, सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख महादेव घुले यांच्यासह समितीचे सदस्य आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्यांनंतर अनेक शाळांत शिक्षक अद्यापही रुजू झालेले नाहीत. यात भोर आणि वेल्हे तालुक्यातील संख्या जास्त आहे. वेळोवेळी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही ही पदे भरली जात नसल्याने स्थायी समितीच्या बैठकीत सभासदांनी आक्रमक भूमिका घेतली होती.शिवतरे म्हणाले, की प्रशासनाने दुर्गम भागातील शाळेत बदल्या झाल्यानंतर शिक्षकांना रुजू होण्यास सांगितले. मात्र, अनेकांनी कारणे देत नेमून दिलेल्या शाळेवर रुजू होण्यास असमर्थता दर्शविली. अशा शिक्षकांवर थेट कारवाईची मागणी यावेळी त्यांनी केली. याबाबत तक्रारी केल्यास केवळ मुळमुळीत उत्तरे आम्हाला मिळतात. यामुळे या प्रश्नावर दोन दिवसांत तोडगा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.बाहेरील जिल्हा परिषदेतील बदली होऊन जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांची संख्या यात जास्त आहे. ते प्रशासनाला सहकार्य करीत नसतील तर त्यांना परत त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवण्यात यावे, अशी मागणीही सभासदांनी यावेळी केली.आंतरजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना समानीकरणानुसार पदस्थापना देण्यात येणार आहे. त्याना त्यांच्या पसंतीने शाळा मिळावी यासाठी समुपदेशन ठेवण्यात आले. परंतू, शिक्षक समुपदेशनाला हजर राहिले नाही. ज्या तालुक्?यात अधिक जागा रिक्त आहेत त्याठिकाणी प्राधान्याने शिक्षक देण्यात येणार आहे. ज्यांना मान्य नाही त्यांना परत ज्या जिल्ह्यातून आले त्याठिकाणी पाठविण्यात यावे. त्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये सदस्य आणि पदाधिकारी यांनीही एकमताने संमती दर्शवली आहे. त्यामुळे जे शिक्षक तयार होतील त्यांना पदस्थापना देण्यात येईल.- सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदआॅनलाईन बदली प्रक्रियेनंतर अनेक शिक्षकांना दुर्गम भागातील जागा मिळाल्या. मात्र, यातील अनेक शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. जवळपास४०० शाळांतील पदे ही रिक्त आहेत.यात भोर आणि वेल्हे तालुक्याची संख्या जास्त आहे. भोरमध्ये जवळपास १०४ शाळा व वेल्हेतील ९० शाळांवर शिक्षक रुजू झालेले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण