शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

'बंडूअण्णा आणि इतर आरोपींना फाशी किंवा जन्मठेप द्या', कल्याणी कोमकर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:23 IST

अण्णांच्या अंगाखांद्यावर वाढलेला तो त्याचं नाव पण प्रेमाने त्यांनीच गोविंदा ठेवलं, स्वतःच्या नातवाला मारताना त्यांना दया आली नाही का?

पुणे: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नानापेठ परिसरामध्ये गोविंदा उर्फ आयुष कोमकर या युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. खरंतर हे सगळं प्रकरण पूर्व वैमनस्यातून झाल्याचं आणि बदलीच्या भावनेतून झाल्याचे आरोप होत आहेत. या सगळ्या प्रकरणावर आयुषची आई कल्याणी यांनी बंडूअण्णा आंदेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर बरोबर एक वर्षांनी गणेश कोमकरचा मुलगा आयुष्य याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आंदेकर कुटुंबीयांनी हा कट रचल्याचा आरोप होऊ लागला आहे. गणेश कोमकरच्या पत्नीनेही बंडूअण्णा आंदेकर यांच्यावर आरोप करत सगळं काही सांगितलं आहे. 

कल्याणी म्हणाल्या, बंडूअण्णा आता म्हणताहेत की आयुष्य हा माझा नातू आहे. मी असं करणार नाही. मी ठामपणे सांगू शकते की, त्यांचा प्लॅनच असतो की आम्ही बाहेर जातो. तुम्ही हे करा म्हणजे आमच्यावर नाव येणार नाही. मी त्यांना चांगलीच ओळखून आहे. त्यामुळे मी म्हणते आता त्यांना आत ठेवले तर बाहेर येऊनच देऊ नका. त्यांना फाशीची शिक्षा नाहीतर जन्मठेप असं काहीतरी होऊद्या अशी मागणी त्यांनी लोकमतशी बोलताना त्यांनी केली आहे. पुण्यातला दहशतवाद थांबवण्यासाठी त्यांना सोडूच नये. पोलिसांनी आणि अजित दादा, देवेंद्र फडणवीसांनी जातीने आमच्याकडं लक्ष द्यावं. आमचा मुलगा कशातच नव्हता. त्याला फक्त न्याय मिळवून द्यावा. तो इतका साधा होता. त्यांनी आम्हाला सांभाळलं. आमच्याकडं लक्ष दिलं म्हणजे तो इतका समजूतदार होता की यात कशातच तो नव्हता. माझी हीच विनंती मी त्याच्यासाठी जास्त काहीच करू शकले नाही. मला फक्त आता त्याच्यासाठी न्याय पाहिजे. 

बंडूअण्णा हे माझा नातू असल्याची भावनिक साथ ते खरंतर कोर्टामध्ये घालताना दिसतायेत. आम्ही महाराष्ट्रात नव्हतो केरळला होतो असेही ते कोर्टात म्हणाले. याबाबत बोलताना कल्याणी म्हणाल्या,  त्यांना काळीज कसं नाही. त्यांच्याच अंगाखांद्यावर वाढलेला तो त्याचं नाव पण प्रेमाने त्यांनीच गोविंदा ठेवलंय. त्याचा जन्म झाल्यावर बंडूअण्णा आणि गणेश कोमकर ते सगळे बालाजीला गेले होते. अण्णांनीच त्याचं नाव ठेवले मग एवढं त्या मुलाविषयी तरी तुम्हाला दया नाही आली.  काहीच वाटलं नाही. बदला घ्यायचा होताना आणि कसला बदला आम्ही काय केलंच नाहीये. गणेशने त्याच्या मृतदेहावर हात ठेवून शपथ घेतली की, मी काहीच केलं नाही तरी मी ही शिक्षा भोगतोय. हे सगळे राजकीय दबाव टाकतायेत. त्यांचा सगळा पैशावर खेळ आहे. पण आज निष्पाप मुलाचा जीव गेला. आणि आता अजूनही कृष्णा, शिवम, अभिषेक, लक्ष्मी, आंदेकर हे सगळे फरार आहेत. तर अजून आमच्या जीवाला धोका आहे. आमच्या घरात मुलं आहेत. त्यांचा पण जीव धोक्यात आहे. ते आज घराबाहेर जाऊ शकत नाहीत. वनराज आंदेकरांचा खून आम्ही केला नसताना आम्ही एवढं भोगलं. तेव्हा सगळे आमच्या विरोधातच बोलत होते की. आम्हीच केलं बहिणींनी सुपारी दिली कोणी बाईला आम्ही सुपारी दिली का? आम्ही कोणाशी बोलताना पाहिलं काहीच नाही आणि दाजींनीच खून केला मेव्हण्याचा असे पण म्हणत होते.  

आमच्याच लोकांनी आमचा घात केलाय हे मी ठामपणे सांगू शकते. कारण का ती मुलं त्यांचीच आहेत. आणि आता फरार अण्णा जेव्हा सापडले तेव्हाच ती दोन मुलं पण सापडली. मग ती मुलं त्यांच्याबरोबर सापडलीच कशी? असं मी म्हणते. बरं. पण आता या प्रकरणामध्ये बरेच जणांना अटक पण झालेली आहे. त्यांना पोलीस कोठडी पण सुनावलेली आहे. या सगळ्या प्रकरणात अजूनही FIR किंवा गुन्हे दाखल झालेले नाहीयेत. पोलीस आम्हालाही फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला येऊन देत नाहीत. पोलिसांनी अजूनपर्यंत आमची नीट बाजू व्यवस्थित ऐकून घेतलेली नाहीये. ही लोकं अशी किती मोक्याचे केसेस असले की आत जातात आणि लगेच बाहेर येतात. सहा महिन्यांनी दीड वर्षांनी तर असं होता कामा नये. आता हे आत गेले तर आताच नाही का यांना जन्मठेप नाहीतर फाशी दिली पाहिजेल अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसDeathमृत्यूCourtन्यायालयPoliticsराजकारण