HSC Exam Result 2025: बारामतीत यंदा देखील मुलींची बाजी; बारावीचा एकूण निकाल ९५.६० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:00 IST2025-05-05T16:59:35+5:302025-05-05T17:00:06+5:30

गतवर्षी हाच निकला ९६.३२ टक्के लागला होता, त्या तुलनेने यंदा निकलाच्या टक्केवारीत किंचित ०.७२ टक्के घट झाली

Girls win in Baramati this year too Overall hsc result of 12th is 95.60 percent | HSC Exam Result 2025: बारामतीत यंदा देखील मुलींची बाजी; बारावीचा एकूण निकाल ९५.६० टक्के

HSC Exam Result 2025: बारामतीत यंदा देखील मुलींची बाजी; बारावीचा एकूण निकाल ९५.६० टक्के

बारामती : महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाकडून फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा बारामती तालुक्याचा निकाल ९५.६० टक्के लागला आहे. गतवर्षी हाच निकला ९६.३२ टक्के लागला होता. गतवर्षीच्या तुलनेने यंदा निकलाच्या टक्केवारीत किंचित ०.७२ टक्के घट झाली आहे.

बारामती तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुलींनी निकालात बाजी मारली आहे. परीक्षेस बसलेल्या ४१६१ मुलींपैकी ४०७३ मुली म्हणजेच ९७.८८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ३९६० मुलांपैेकी ३६९१ म्हणजे ९३.२० टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलांच्या तुलनेने मुलींचा ४.६८ टक्के निकाल अधिक लागला आहे. तालुक्यात एकुण ८१२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ९९५ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी (डीस्टींक्शन) प्राप्त केली. प्रथम श्रेणीत ३०२३ तर द्वितीय श्रेणीतत ३१९० विद्यार्थी,तर पास श्रेणीत ५५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ७७६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बारामती शहर आणि तालुक्यातील महाविद्यालयनिहाय निकालाची टक्केवारी पुढील प्रमाणे

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती ९३.९४ टक्के, एम. एस. काकडे ज्युनिअर कॉलेज, सोमेश्वरनगर- ८३.००, आर.एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट कनिष्ठ महाविद्यालय- ९८.१८, श्री शहाजी ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सुपे ९९.४६, श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती- ८८.३९, न्यू ज्युनियर कॉलेज, वडगाव निंबाळकर- ६६.६६, म.ए.सो. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बारामती- ८८.२३, शारदाबाई पवार विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिवनगर- १००, श्री मयुरेश्वर विद्यालय व उच्च महाविद्यालय,मोरगाव ९८.६४. 

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, वाणेवाडी ७६.४७ , नव महाराष्ट्र विद्यालय ज्युनियर कॉलेज, पणदरे- ९४.७६, शारदाबाई पवार महाविद्यालय, शारदानगर- ९९.७३, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी- ४४.४४, आनंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, होळ- ८९.६५, विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय- बारामती ९६.५९, सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर- ९९.३४, उत्कर्ष जुनियर कॉलेज, वाघळवाडी- ९२.५९, श्रीमंत शंभूसिंह महाराज ज्युनिअर कॉलेज, माळेगाव- ७६.९२, कृषी उद्योग शिक्षण संस्था, का-हाटी- ८९.९२, एस.व्ही.एम. अँड ज्युनिअर कॉलेज,भिकोबा नगर-९५.१२, सदगुरु शिक्षण मंडळ, लोणी भापकर- ९०.४७, शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर- ९९.७६, श्री सिद्धेश्वर जुनियर कॉलेज कोऱ्हाळे बुद्रुक ९९.१९, कै. जिजाबाई गावडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पारवडी- ९५.४५, म. ए. सो. उच्च माध्यमिक विद्यालय- १००, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल- १००, धों.आ. सातव कारभारी विद्यालय, बारामती- १००, अभिनव इंटरनॅशनल स्कुल ८०,शारदा निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय- ७५, एस.पी.सी.टी.एस. ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स- ९६.८१, क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज- १००, अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल संग्राम नगर- ९९.४७, अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पळशी- ९१.६६, आदित्य इंटरनॅशनल स्कूल वंजारवाडी १००,एसडी सह्याद्री पब्लीक स्कुल ९६.९६, शारदाबाई पवार आयटीआय शारदानगर ४४.४४, मयुरेश्वर प्रतिष्ठान आयटीआय खंडूखैरेवाडी ६६.६६, शासकीय आयटीआय ८९.४७,केयुएमएसएस खासगी आयटीआय ६३.३३. 

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय (व्होकेशनल) ८४.०९, मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर (व्होकेशनल)-५६.२५, आर.एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज (व्होकेशनल)- ७०, श्री शहाजी उच्च माध्यमिक विद्यालय, सुपे (व्होकेशनल) १००, शारदाबाई पवार विद्यालय व जुनिअर कॉलेज, शिवनगर (व्होकेशनल) ९६.८७, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज, वाणेवाडी (व्होकेशनल) ९१.३०.

Web Title: Girls win in Baramati this year too Overall hsc result of 12th is 95.60 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.