शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पाठीला बाक असलेली मुलगी जगु लागली ताठ मानेने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 12:47 PM

 ‘कायफोस्कोलिओसिस’ हा विकाराने त्रस्त केले शस्त्रक्रियेसाठी २४ स्क्रू वापरण्यात आले व तिची पाठ सरळ करण्यात पूर्णपणे यश आले.

ठळक मुद्देआरोग्य योजना व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक विभाग यांच्या मदतीने माफक खर्चात शस्त्रक्रियाशस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आले २४ स्क्रू

पुणे : मागील काही वर्षांपासून मणक्याच्या विकाराने पाठीला आलेला बाक शस्त्रक्रियेद्वारे सरळ करण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. आता ही मुलगी इतर मुलांप्रमाणे ताठ मानेने चालत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक विभाग यांच्या मदतीने माफक खर्चात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शिरूर तालुक्यातील रामलिंग गावातील शेतकरी कुटूंबातील ही मुलगी आहे. मागील काही वर्षांपासून मुलीच्या पाठीला बाक होता. तिला ‘कायफोस्कोलिओसिस’ हा विकाराने त्रस्त केले होते. तिच्या पालकांनी अनेक खाजगी डॉक्टरांना दाखविले. पण शस्त्रक्रियेचा खर्च खुप असल्यामुळे पालक उपचार टाळत होते. ससून रुग्णालयामध्ये तपासणी केल्यानंतर त्यांना आशेचा किरण सापडला. रुग्णालायतील मणकाविकार तज्ज्ञ डॉ. अंबरीश माथेशूळ यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी एक्सरे, एम.आर.आय., सिटीस्कॅन या तपासण्या करण्यात आल्या. मुलीच्या पाठीच्या ठिकाणी दोन बाक असल्याचे यामध्ये आढळून आले. बाक सरळ करण्याची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी २४ स्क्रू वापरण्यात आले व तिची पाठ सरळ करण्यात पूर्णपणे यश आले. शस्त्रक्रिये दरम्यान मज्जारज्जू व नसांना धक्का लागू नये व पायाची ताकद जाऊ नये यासाठी अत्याधुनिक  नयूरोमॉनिटरिंग वापरण्यात आले. ही शस्त्रक्रिया तब्बल पाच तास चालली. त्यामुळे कमीतकमी रक्तस्त्राव व्हावा याची दक्षता घ्यावी लागली. शस्त्रक्रियेनंतर मुलीची पाठ सरळ झाली असून ती आता सर्वसामान्यांप्रमाणे आपले आयुष्य जगु शकणार आहे, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अंबरीश माथेशूळ, डॉ. सुशांत घुमरे, भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी व डॉ. रोहित संचेती यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. ---------- वाकडी पाठ, कुबड व बाक (कायफोस्कोलिओसिस) हा आजार वयाच्या ५  ते १५ वर्षांच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. या आजारामुळे पाठ वाकडी होते, उंची कमी होते व पायाला व कमरेला कमजोरी येते. वय १० ते १४ या दरम्यान उपचार घेतल्यानंतरच पाठ सरळ करता येते. ससूनमध्ये या आजाराचे उपचार उपलब्ध आहे.- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलHealthआरोग्य