लग्न कर, नाही तर ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करेन! महिलेला धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 09:09 IST2024-06-03T09:08:43+5:302024-06-03T09:09:06+5:30

पुणे : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. १) जॉनी जिलानी ...

Get married or I will make 'that' video go viral! A case has been registered against the person who threatened the woman | लग्न कर, नाही तर ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करेन! महिलेला धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

लग्न कर, नाही तर ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करेन! महिलेला धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. १) जॉनी जिलानी शेख (वय २६, रा. तेलंगणा) याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते १ जून २०२४ यादरम्यान घडला आहे. आरोपी याने फिर्यादी महिलेसोबतच्या प्रेमसंबंधांचा फायदा घेऊन महिलेला एका हॉटेलमध्ये बोलावून अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर व्हॅाट्सॲपवर मेसेज करून माझ्याशी लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करेन, तुझे अश्लील फोटो व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली.

महिलेने प्रतिकार केला असता तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन आणि तुमची रिक्षा जाळून टाकेन अशी धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिंदे करीत आहेत.

Web Title: Get married or I will make 'that' video go viral! A case has been registered against the person who threatened the woman