पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून गुप्तांग कापून खून; दिल्लीतून आरोपीला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 10:20 IST2022-11-21T10:19:43+5:302022-11-21T10:20:26+5:30

आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली...

Genital mutilation on suspicion of having an immoral relationship with his wife; The accused was taken into custody from Delhi | पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून गुप्तांग कापून खून; दिल्लीतून आरोपीला घेतले ताब्यात

पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून गुप्तांग कापून खून; दिल्लीतून आरोपीला घेतले ताब्यात

हडपसर : घराशेजारीच राहणाऱ्या मित्राचा पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा समज करून चाकूच्या साहाय्याने खून करून त्याच्या गुप्तांगाचा भाग कापून पसार झालेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी दिल्लीतून शिताफीने अटक केली. आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अरुण किसन सूर्यवंशी (वय ५४, रा. मांजरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे तर पिताराम केवट (वय २३, रा. मांजरी, मूळ. मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. अरुण व पिताराम हे मित्र व एकत्र काम करीत होते. अरुणचे पत्नीसोबत गैरसंबंध आहेत असा समज करून पिताराम केवट याने अरुणचा काटा काढायचे ठरवले होते. अरुण व पिताराम एकत्र दारू प्यायले होते. पितारामने घरातला चाकू सोबत घेऊन अरुणला घरामागील मोकळ्या मैदानात नेले. संशयाचे खूळ डोक्यात असलेल्या पितारामने चाकूच्या साहाय्याने अरुणचा खून करून गुप्तांगही कापून टाकले. त्यानंतर आपल्या खोलीतील सर्व सामान घेऊन तो फरार झाला. पोलिसांना गुंगारा देऊन दिल्ली येथे लपून बसलेल्या पिताराम केवट याला ताब्यात घेतले.

हडपसर तपास पथकातील सहायक फौजदार सुशील लोणकर, समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ व निखिल पवार यांना आरोपी दिल्ली येथे असल्याचे खबऱ्यांकडून समजले. तपास पथक दिल्ली येथे गेले असताना सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस नाईक संदीप राठोड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिल्ली येथील तपास पथकाला मार्गदर्शन केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वास डगळे करीत आहेत.

Web Title: Genital mutilation on suspicion of having an immoral relationship with his wife; The accused was taken into custody from Delhi