GBS outbreak in Pune : पुण्यात तीन रुग्णांची वाढ; सर्वाधिक रुग्ण २० ते २९ वयोगटातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 14:36 IST2025-02-05T14:35:45+5:302025-02-05T14:36:01+5:30

जीबीएस झालेल्या एकूण रुग्णांमध्ये २० ते २९ वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त म्हणजे संख्या ३६ आहे

GBS outbreak in Pune Three more patients in Pune Most patients are in the age group of 20 to 29 | GBS outbreak in Pune : पुण्यात तीन रुग्णांची वाढ; सर्वाधिक रुग्ण २० ते २९ वयोगटातील

GBS outbreak in Pune : पुण्यात तीन रुग्णांची वाढ; सर्वाधिक रुग्ण २० ते २९ वयोगटातील

- अंबादास गवंडी

पुणे :
गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांमध्ये दररोज वाढ होत असून, मंगळवारी नव्याने तीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे पुण्यातील जीबीएस संशयित रुग्णसंख्या १६६ झाली आहे. यापैकी ५२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, ६१ रुग्ण आयसीयूमध्ये आणि २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

बाधितांमधील ३३ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील, तर ८६ रुग्ण समाविष्ट गावांतील आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील २०, ग्रामीणमधील १९ आणि इतर जिल्ह्यांतील ८ रुग्णांचा यात समावेश आहे. बाधित रुग्णसंख्येत २० ते २९ वयोगटातील सर्वाधिक ३५, तर ० ते ९ वयोगटातील २४ आणि ५० ते ५९ वयोगटातील २५ रुग्णांचा समावेश आहे.

सर्वाधिक रुग्ण २० ते २९ वयोगटातील

पुण्यात आतापर्यंत १६६ ‘जीबीएस’चे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहेत; परंतु जीबीएस झालेल्या एकूण रुग्णांमध्ये २० ते २९ वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त म्हणजे संख्या ३६ आहे. यानंतर ५० ते ५९ वयोगटातील रुग्णांची संख्या २५ आहे.

Web Title: GBS outbreak in Pune Three more patients in Pune Most patients are in the age group of 20 to 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.