गौतम नवलाखा हे देशद्रोहीच : सरकारी पक्षाचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 03:17 PM2019-11-07T15:17:59+5:302019-11-07T15:23:21+5:30

तोपर्यंत नवलाखा यांना अटक करू नये..

Gautam Navlakha is a Anti National : the government's argument | गौतम नवलाखा हे देशद्रोहीच : सरकारी पक्षाचा युक्तिवाद

गौतम नवलाखा हे देशद्रोहीच : सरकारी पक्षाचा युक्तिवाद

googlenewsNext
ठळक मुद्देनवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरीम संरक्षण 11 नोव्हेंबर रोजी संपणार

पुणे : माओवादी संघटना आणि काश्मीरमधील हिजबुल मुजाहिदीन या दोन्ही संघटनांच्या एल्गार आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा हे संपर्कात होते. या दोन्ही संघटनेच्या प्रमुखांची बैठक व्हावी यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यांच्या कारवाया देशासाठी घातक आहे. त्यामुळे गौतम नवलाखा हे देशद्रोही असल्याचा युक्तिवाद गुरुवारी जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी केला.

संशयित आरोपी गौतम नवलाखा यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यांनी हिजबुल मुजाहिदीन संघटनेशी संपर्क साधून देशाचे किती नुकसान केले?, माओवादी संघटनेत किती विद्यार्थ्यांची भरती केली आहे? संघटनेसाठी पैसा कसा उभा केला याचा तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड. पवार यांनी न्यायालयात सांगितले.

नवलाखा यांचे विविध पत्रांमध्ये नाव असले तरी त्यांचा दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे कुठेही स्पष्ट झालेले नाही. सत्यशोधन समितीबाबत त्यांनी केलेली काम हे कायदेशीर आहेत. गेल्या वर्षभरात त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील रागिणी आहुजा यांनी केला.


तोपर्यंत नवलाखा यांना अटक करू नये 
नवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरीम संरक्षण 11 नोव्हेंबर रोजी संपत आहे. तर त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल 12 नोव्हेंबरला होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निकाल होईपर्यंत नवलाखा यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांना दिले आहेत.

Web Title: Gautam Navlakha is a Anti National : the government's argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.