पिंपरी : शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने घरात चोरी केली. शेजारच्या घरातून त्याने १३ हजार ८०० रुपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बावधन येथील पुंडलिक दगडे चाळीत २७ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.वैभव मोहन वाघ (२३, रा. बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. राज रवींद्र कांबळे (रा. बावधन, पुणे, मूळ रा. बीड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज हा फिर्यादी वैभव यांच्या शेजारी राहतो.
राज याने वैभव यांच्या घराचे कुलूप काढून आत प्रवेश केला. घरातून गॅस टाकी, शेगडी, सिलिंग फॅन, होम थिएटर, कपाट, हिटर, ग्रायंडर, असे १३ हजार ८०० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. सहायक पोलिस निरीक्षक बालाजी ठाकूर तपास करीत आहेत.