शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वानवडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकणे मनसेला भोवले; नगरसेवकासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 12:51 IST

मनसेच्या नगरसेवकासह कार्यकर्त्यांनी वानवडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने घुसत कचरा टाकत आंदोलने केले होते.

पुणे : वानवडी - रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरुन सहायक कार्यालयात सर्वत्र ओला सुका कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणार्‍या मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकत्यांविरुद्ध वानवडीपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वत: नगरसेवक असतानाही बाबर यांनी तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्सिंगचे नियम न पाळल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याखालीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी सहायक आयुक्त किशोरी शिंदे यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वानवडी क्षेत्रिय कार्यालयात सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला होता. सहायक आयुक्त किशोरी शिंदे या दिल्लीतील पथकासोबत कार्यालयाचे कार्यक्षेत्रात येणार्‍या प्रभागांतील स्वच्छ सर्व्हेक्षण योजनेची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. याची साईनाथ बाबर यांनी गोरख इंगळे याच्याकरवी फोन करुन माहिती घेतली. शिंदे या कार्यालयात नाहीत, हे लक्षात आल्यावर बाबर, इंगळे व त्यांचे १० ते १५ कार्यकर्ते महापालिकेने घातलेले निर्बंध न पाळता कार्यालयात शिरले. त्यावेळी उपअभियंता बागडे व प्रभारी अधीक्षक पांडुरंग लोहकरे यांनी त्यांच्याकडे काय काम आहे, अशी विचार केली. तरीही ते जबरदस्तीने शिंदे यांच्या केबिनमध्ये घुसले.

क़ार्यालयात सोबत आणलेला ओला, सुका व कुजलेला कचरा टाकला. पुन्हा कार्यालयातील संपूर्ण लॉबीमध्ये देखील कचरा टाकून घाण केली. तसेच कार्यालयातील इतर सहकार्‍यांच्या टेबलवर व कार्यालयातील कागदपत्रे व फाईलींवर कचरा टाकून काम करण्यास अडथळा आणला.  कोविड १९चे कोणत्याही नियमांचे पालन न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेWanvadiवानवडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMNSमनसे