शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या दिमतीला कचरा ठेकेदाराची गाडी

By admin | Updated: May 26, 2015 01:14 IST

पुणे शहराचे महापौर गेल्या साडेतीन वर्षांपासून कचरा ठेकेदाराची मोटार वापरीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

पुणे : राज्यातील अ वर्ग महापालिकेचा दर्जा मिळवून मेट्रो सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या पुणे शहराचे महापौर गेल्या साडेतीन वर्षांपासून कचरा ठेकेदाराची मोटार वापरीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. प्रशासनाने त्यांच्या ताब्यात असलेली कचरा ठेकेदाराची मोटार महापौरांना वापरण्यासाठी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सोमवारी मोटारीबाबत माहिती घेतली असता हा प्रकार उजेडात आला. महापौर आणि उपमहापौर यांच्या नवीन मोटारी खरेदीसाठी २३ लाख रुपये वर्गीकरणातून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये त्यावर निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी कधी मोटार खरेदी करण्यात आली होती, याची माहिती घेत ही मोटार कचरा ठेकेदाराच्या मालकीची असल्याचे उजेडात आले.कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने हंजर कंपनीबरोबर २०१२ मध्ये करार केला होता. हंजर कंपनीच्या कचरा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी बाहेरून पाहुणे आल्यास त्यांना तिथे घेऊन जाण्यासाठी हंजर कंपनीने महापालिकेला मोटार उपलब्ध करून द्यावी असे या करारामध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने मोटार दिली होती, दरम्यानच्या काळात त्या मोटारीचा अपघात होऊन ती नादुरुस्त झाली. त्या वेळी ठेकेदाराने नवीन टोयाटो आल्टिस ही गाडी खरेदी करून पालिकेला दिली. तत्कालीन महापौर वैशाली बनकर यांची मोटार वारंवार नादुरुस्त होत असल्याने प्रशासनाने त्या वेळी ठेकेदाराची टोयाटो आल्टिस गाडी महापौरांना वापरण्यासाठी दिली. तेव्हा ही मोटार महापौर वापरीत आहेत. वैशाली बनकर यांच्यानंतर सव्वा वर्ष चंचला कोंद्रे यांनी ही गाडी वापरली. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून दत्तात्रय धनकवडे ही मोटार वापरीत आहेत. प्रशासनाकडून महापौरांना ठेकेदाराच्या मालकीची मोटार दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ठेकेदाराकडून महापालिकेला ही मोटार देण्यात आली आहे, मात्र ती महापालिकेच्या नावावर ट्रान्सफर करण्याचे काम राहून गेले असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे. (प्रतिनिधी) उपमहापौरांसाठी वर्षभरात नवीन मोटार?उपमहापौर आबा बागुल यांच्याकडील टाटा मांझा कंपनीची मोटार एप्रिल २०१४ मध्ये घेण्यात आली असून, त्या मोटारीचे २१ हजार ७२१ किमी रनिंग झाले आहे. एका वर्षातच उपमहापौरांसाठी नवीन मोटार घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याचा भुर्दंड महापालिकेला बसणार आहे. सतत नादुरुस्त असल्याने नवीन खरेदीसध्या वापरात असलेली टोयाटो आल्टिस ही मोटार सातत्याने नादुरुस्त होत आहे, त्यामुळे प्रशासनाने नवीन मोटार खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. ही मोटार कधी केली याची आज अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असताना हंजर कंपनीच्या ठेकेदाराकडून ही मोटार महापालिकेकडे आली असल्याची माहिती मिळाली. -दत्तात्रय धनकवडे, महापौर