पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दर्ग्यात गणपतीची आरती; सर्वधर्मसमभाव कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 21:43 IST2022-04-24T21:42:22+5:302022-04-24T21:43:06+5:30
सर्वधर्मसमभाव या अनुषंगाने भजन, कीर्तने, वासंतिक ओटी पूजा आणि रोजा इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दर्ग्यात गणपतीची आरती; सर्वधर्मसमभाव कार्यक्रम
पुणे: पुणे पोलीस आयुक्तालय, येरवडा पोलीस स्टेशन आणि शाहदावल बाबा दर्गा कमिटी यांच्या वतीने सर्वधर्मसमभाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बाबांच्या गादी समोर गणपती आरती करण्यात आली.
पुणे: पुणे पोलीस आयुक्तालय, येरवडा पोलीस स्टेशन आणि शाहदावल बाबा दर्गा कमिटी यांच्या वतीने सर्वधर्मसमभाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बाबांच्या गादी समोर गणपती आरती करण्यात आली. (फोटो- तन्मय ठोंबरे) pic.twitter.com/z0khhUku6R
— Lokmat (@lokmat) April 24, 2022
तसेच सर्वधर्मसमभाव या अनुषंगाने भजन, कीर्तने, वासंतिक ओटी पूजा आणि रोजा इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य हिंदू - मुस्लिम बांधवांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. रोजा इफ्तार कार्यक्रमात बंधू भगिनी एकमेकांना घास भरवताना दिसून आले. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वांच्या उपस्थितीत हा आनंदी सोहळा पार पडला.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दर्ग्यात गणपतीची आरती; सर्वधर्मसमभाव कार्यक्रम (व्हिडिओ- तन्मय ठोंबरे) pic.twitter.com/MBEm5xTPeY
— Lokmat (@lokmat) April 24, 2022