शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगातील मारहाणीचा बदला घेण्यासाठी गुंड अविनाश धनवेचा गेम; इंदापुरातील 'त्या' खून प्रकरणा उलघडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 13:46 IST

तुरुंगात झालेल्या मारहाणीचा बदला म्हणून आरोपींनी अविनाश धनवे याचा खून केल्याचे आता तपासात समोर आले आहे...

- किरण शिंदे 

पुणे :पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ असणाऱ्या जगदंब हॉटेलमध्ये अविनाश बाळू धनवे (वय ३१) या तरुणाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या हत्याकांडाचे सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असून चार आरोपींना अटक केली आहे. तुरुंगात झालेल्या मारहाणीचा बदला म्हणून आरोपींनी अविनाश धनवे याचा खून केल्याचे आता तपासात समोर आले आहे. 

शिवाजी बाबुराव भेंडेकर (वय ३५, पद्मावती रोड, साठे नगर, आळंदी देवाची), मयूर उर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय २०, आंबेडकर चौक, पोलीस चौकीसमोर आळंदी देवाची), सतीश उर्फ सला उपेंद्र पांडे (वय २०, चरवली रोड, सोपानजाई पार्क, आळंदी देवाची) आणि सोमनाथ विश्वंभर भत्ते (वय २२, मरकळ रोड, सोळू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आणखीन चार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अविनाश धनवे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याची आळंदी आणि चरोली परिसरात दहशत होती. आळंदी परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांसोबत त्याचे वैमनश्य होते. त्याच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर असे सहा गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये त्याच्या विरोधात मुक्का लावण्यात आला होता. तेव्हापासून तो तुरुंगात होता. फेब्रुवारी महिन्यात तो तुरुंगातून सुटून आला होता. तर आरोपी शिवाजी भेंडेकर हा देखील खुनाच्या गुन्ह्यात २०१२ पासून तुरुंगात होता. २०२२ मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगात असताना धनवे यांनी शिवाजी भेंडेकर आणि मयूर उर्फ बाळा मुकेश पाटोळे याला मारहाण केली होती. याच मारहाणीचा बदला त्यांनी धनवेचा खून करून घेतलाय अशी माहिती आता समोर येत आहे. 

दरम्यान ज्या दिवशी अविनाश धनवे याचा खून झाला त्या दिवशी तो आळंदी येथून पंढरपूरला जाण्यासाठी निघाला होता. तेव्हापासूनच आरोपी त्याच्या मागावर होते. इंदापूर परिसरातील जगदंब हॉटेलवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अविनाश धनवे आणि त्याचे मित्र जेवण करण्यासाठी थांबले होते. हीच संधी साधून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. आरोपी मयूर उर्फ बाळा मुकेश पाटोळे यांनी सर्वात आधी अविनाशवर गोळी झाडली. त्याच्यावर एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या. आणि त्यानंतर चार कोयत्याने वीस हुन अधिक वार करण्यात आले. डोक्यात गोळी लागल्याने अविनाश धनवेचा जागीच मृत्यू झाला होता.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसIndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंग