सराईत गुंडाला पिस्तुलासह जेरबंद; दत्तवाडी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 15:36 IST2021-01-09T15:35:30+5:302021-01-09T15:36:07+5:30
जाळपोळ, अग्नीशस्त्रे जवळ बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल

सराईत गुंडाला पिस्तुलासह जेरबंद; दत्तवाडी पोलिसांची कारवाई
पुणे : दत्तवाडी येथील बाल शिवाजी चौकाजवळ थांबलेल्या सराईत गुंडाला दत्तवाडी पोलिसांकडून त्याच्याकडून पिस्तुल व काडतुस जप्त केले. गोपाळ ऊर्फ राेहितभाऊ बंडु गवळे (वय २२, रा. अप्पर इंदिरानगर) असे त्याचे नाव आहे. गवळे याच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जाळपोळ, अग्नीशस्त्रे जवळ बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अक्षयकुमार वावळे व कुंदन शिंदे यांना गवळे याच्याविषयी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बाल शिवाजी चौकाजवळील ओढ्यालगत मोकळ्या जागेत थांबलेल्या गोपाळ गवळे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस असा ३० हजार २०० रुपयांचा माल मिळाला. दत्तवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.