शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या विहीरीवरील विद्युतपंप चोरी करणारी टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:49 IST

चोरीने हैराण झालेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा; ६ जणांना  अटक; ३ लाख १६ हजारांचा  मुददेमाल हस्तगत

बारामती - जिरायती भागात शेतातील विहीरीवरील विद्युतपंपाच्या चोरीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या मोठा दिलासा मिळाला आहे. वडगाव निंबाळकर पोलीसांनी धडाकेबाज कारवाई करीत या प्रकरणाची पाळेमुळे खणुन काढत  पाणबुडी,विद्युतपंप  चोरी प्रकरणात  सराईत ६ गुन्हेगारांना अटक केली आहे. गुन्हयातील एकुण ३ लाख १६ हजार ७०० रुपयांचा  मुददेमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.सुदर्शन राठोड यांनी अधिक माहिती दिली.तालुक्यातील लोणीभापकर, सायंबाचीवाडी  गावचे हददीतील शेतकरी यांचे शेतातील विहिरीतील विद्युतपंप चोरीचे प्रकार वाढीस लागल्याने शेतकरी वर्ग अस्वस`थ होता.शेतीचे नुकसान होण्याची भीती होती.या अनुशंगाने प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तौफीक मणेरी, भाउसाो मारकड यांनी गोपनीय माहीती काढत आरोनींची माहिती मिळविली.आरोपी ओंकार राजेश आरडे (वय २५), महेश दिलीप भापकर (वय - ३१)अमोल लहु कदम (वय - २८ ) निलेश दत्तात्रय मदने (वय - २८ )प्रथमेश जालिंदर कांबळे (वय २२ सर्वजण रा. लोणीभापकर ता. बारामती जि. पुणे )यांना ताब्यात घेवुन चौकशी केली. तसेच गापेनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे वरील आरोपींकडे  अधिक चौकशी केली असता त्यांनी विद्युतपंप चोरी केलेचे कबुली दिली.तसेच  आरोपी  कालीदास शिवाजी भोसले (वय–४२ रा. लोणी भापकर) यास विक्री केलेची कबुली दिली. सर्व आरोनींना अटक करण्यात आली आहे.विद्युतपंप चोरीचे  १७ गुन्हे उघड झाले आहेत. तसेच त्यांचेकडुन इतर  गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.दरम्यान,चोरी उघड झाल्याने शेतकर्यांनी अप्पर पोलीस अधिकारी बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.राठोड,सहायक पोलीस निरीक्षक काळे यांना सन्मानित केले.पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे,पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे,राहुल सुतार आदींनी या कारवाइत सहभाग घेतला. अटक करण्यात आलेले बहुतांश आरोपी शेतकरी कुटुंबातील आहेत.सर्वजण गावातील मुले आहेत.त्यांनी गावातच चोरी केल्याने पोलीसांसमोर चोरीचा छडा लावणे मोठे  आव्हान होते.मात्र, पोलीसांनी मोेठ्या शिताफीने हा गुन्हा उघड केला.त्यामुळे वडगांव निंबाळकर पोलीसांनी अपर पोलीस अधिक्षक गणेश  बिरादार यांनी १० हजारांचेबक्षीस जाहिर केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रPoliceपोलिसBaramatiबारामती