शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

मळद येथे लूटमार करणारी टोळी गजाआड

By admin | Updated: September 25, 2015 01:17 IST

पुणे-सोलापूर महामार्गावर बुधवारी (दि. २३) मध्यरात्री गावठी पिस्तूलचा धाक दाखवून वाहनचालक व इतरांना बेदम मारहाण करून लूटमार केली.

कुरकुंभ : पुणे-सोलापूर महामार्गावर बुधवारी (दि. २३) मध्यरात्री गावठी पिस्तूलचा धाक दाखवून वाहनचालक व इतरांना बेदम मारहाण करून लूटमार केली. सकाळी साडेसात वाजेपर्यंत यातील सर्व आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. मळद (ता. दौंड) येथे ही घटना घडली होती. दौंड पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तुषार बाळू येडे, अक्षय सुरेश होले, शुभम राजाराम थोरवडे, विष्णू मच्छिंद्र विटकर, सचिन संजय गिरमे, किरण शंकर अळगी,अविनाश किसन पवार, सुनील ज्ञानदेव भंडलकर (सर्व रा. कुरकुंभ व परिसर) या आठ आरोपींना दौंड आणि कुरकुंभ पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर दरोडा आणि जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री १.३0च्या सुमारास पाटस टोलनाक्यावर कारमधील (एमएच ४३ अ‍ेजे ५0२) आरोपींनी जीपमधील (एमएच १४ ईएम ९५९९) वाहकाशी वाद घातला. त्यानंतर यातील काही आरोपींनी कुरकुंभ येथील त्यांच्या साथीदारांना जीप अडविण्यास सांगितले. त्यानुसार पाठलाग करीत त्यांनी मळद येथील तलावाजवळ जीप अडविली. गुलाब रामचंद्र शिंदे, नवल जालिंदर शिंदे, ज्ञानल विलास शिंदे (सर्व रा. रासे, ता. खेड) यांना जबर मारहाण करीत गाडीची तोडफोड केली. आणि गाडीतील ६ हजार ५00 रुपयांची रोख रकमेसह इतर ऐवज लंपास केला. त्यानंतर आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक सजन हंकारे, यांच्यासह पंडित मांजरे, कच्चर शिंदे, अमोल भोसले, बापू मोहिते यांनी पाहणी केली. पिकअपमधील वाहकाला व इतर साथीदारांना मारहाण करीत असताना आरोपींनी मारहाणीतील एक साथीदार सचिन गिरमे याचे नाव घेतले होते. हे नाव वाहनचालकांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सचिन गिरमे व त्याच्या सर्व साथीदारांचा सकाळी साडेसातपर्यंत शोधून त्यांना जेरबंद केले. (वार्ताहर)