देशभरात रेल्वे प्रवाशांची लूटमार करणारी टोळी दौंडमध्ये जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 18:36 IST2022-05-30T18:34:28+5:302022-05-30T18:36:05+5:30
लुटमार करण्यासाठी लागणारे हत्यारे जप्त...

देशभरात रेल्वे प्रवाशांची लूटमार करणारी टोळी दौंडमध्ये जेरबंद
दौंड (पुणे): देशभरात रेल्वे प्रवाशांची लूटमार करणारी हरियाणा आणि दिल्ली येथील टोळी दौंडमध्ये जेरबंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. दरम्यान या टोळीकडून चोरी आणि लुटमार करण्यासाठी लागणारे हत्यारे आणि २६ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेl.
विनोद सतबीरसिंग ( वय ३५), राकेश महावीर ( वय ४५), हौंसराज दुपासिंग ( वय ३३), दीपक सूनव राकेश ( वय २९), राजेन रोशन कुमार ( वय ३२, सर्व राहणार हरियाणा) महिंद्र सोनू मुंशीराम ( वय ५२,रा दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई ,वसई, विरारसह देशात अन्य ठिकाणी रेल्वेत चोऱ्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. प्रवाशांची लूट मार करणाऱ्या आरोपींकडून लुटमारीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.