Pune : भाईगिरीसाठी टोळक्याचा तरुणावर खूनी हल्ला; बंडगार्डनमधील घटनेत पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:25 IST2023-06-09T11:23:55+5:302023-06-09T11:25:02+5:30

याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे...

Gang murders youth for Bhaigiri; Five people were arrested in the incident in Bundagarden | Pune : भाईगिरीसाठी टोळक्याचा तरुणावर खूनी हल्ला; बंडगार्डनमधील घटनेत पाच जणांना अटक

Pune : भाईगिरीसाठी टोळक्याचा तरुणावर खूनी हल्ला; बंडगार्डनमधील घटनेत पाच जणांना अटक

पुणे : साथीदाराला मारहाण करीत असल्याचे पाहून त्याला सोडविण्यास आलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोरेगाव पार्कपोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

शुभम माने (वय २२), शुभम साळवे (२२), आकाश चिकटे (२७), तेजस जगताप (१९), कृष्णा राठोड (१८, सर्व रा. ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत यातीन अब्दुल अत्तार (३१, रा. शांतीरक्षक सोसायटी, शास्त्रीनगर, येरवडा) यांनी कोरेगाव पार्कपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार बंडगार्डन येथील ससून रोडवरील सतनाम ट्रॅव्हल्स येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडला.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे सतनाम ट्रॅव्हल येथे कामाला आहेत. त्यांच्यासोबत काम करणारा मुकेश कुमार सरोज याला शुभम माने व शुभम साळवे हे कारण नसताना मारहाण करत होते. त्यांनी सरोज याचा गळा पकडल्याचे पाहून फिर्यादी त्याला सोडविण्यासाठी गेले. तेव्हा माने याने साथीदारांना बोलावले. फिर्यादी यांना शिवीगाळ करून धमकावून तेथे पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला. तसेच फिर्यादीचे सहकारी गोविंद यालाही दगड मारून जखमी केले. अनिल याचे नाक फ्रॅक्चर करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून पाचजणांना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.

Web Title: Gang murders youth for Bhaigiri; Five people were arrested in the incident in Bundagarden