Pune | हनी ट्रॅपद्वारे युवकांना लुटणारी टोळी जेरबंद; नग्न फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 19:21 IST2023-03-08T19:21:44+5:302023-03-08T19:21:53+5:30

कामशेत पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून १२ तासांच्या आत पलायन केलेल्या आरोपींच्या शिर्डी येथे जाऊन मुसक्या आवळण्यात यश आले...

Gang jailed for robbing youths through honey trap; Threatened to post photos on social media | Pune | हनी ट्रॅपद्वारे युवकांना लुटणारी टोळी जेरबंद; नग्न फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी

Pune | हनी ट्रॅपद्वारे युवकांना लुटणारी टोळी जेरबंद; नग्न फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी

कामशेत (पुणे) : मावळात युवतीच्या साहाय्याने हनी ट्रॅपद्वारे युवकांना भेटण्यास बोलावून त्यांना मारहाण करत लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात कामशेत पोलिसांना यश आले आहे. तसेच आरोपींनी या युवकांना नग्न करत फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा धाक दाखवून २ लाख रुपये खंडणीची देखील मागणी केली. ही मारहाण केल्याची घटना बुधवार (दि.१) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कामशेत, लोणावळा कुसगाव, वडगाव, तळेगाव येथे घडली. दरम्यान, कामशेत पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून १२ तासांच्या आत पलायन केलेल्या आरोपींच्या शिर्डी येथे जाऊन मुसक्या आवळण्यात यश आले.

प्रतीक उर्फ लाया अर्जुन निळकंठ (वय २४, रा. छावा चौक कामशेत), रूपेश उर्फ कवठ्या विजय लालगुडे (वय २४, रा. कुसगांव खुर्द), सतीश कृष्णकुमार बिडलाम (वय २८, रा.कामशेत), रोहित गणेश चोपडे (वय २७, रा. कामशेत), साहील महादेव भिसे (वय २०,रा.चिंचवड) व महिला आरोपी (वय २०, रा. वडगाव मावळ) अशी अटक करण्यात आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बेडसे (ता.मावळ) येथील २४ वर्षीय युवकाने कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. १) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास महिला आरोपीने बेडसे येथील २४ वर्षीय फिर्यादी व त्याचे मित्र यांच्या मोबाइलवर फोन करून त्यांना शिवशंकर मंगल कार्यालयाजवळ भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार फिर्यादी व त्याचे चार मित्र हे त्या महिलेस भेटण्यासाठी गेले असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वर नमूद आरोपींनी फिर्यादी व त्यांचे साथीदार यांना चामडी पट्टा, लाकडी दांडके व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना पिस्तुलचा धाक दाखवून तुमच्याविरुद्ध बलात्काराची केस करतो अशी भीती घालून त्यांना गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले.

Web Title: Gang jailed for robbing youths through honey trap; Threatened to post photos on social media