Pune: पूर्ववैमनस्यातून भावांवर टोळक्याचा हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न; कॅम्पमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 09:58 IST2023-06-21T09:56:44+5:302023-06-21T09:58:21+5:30

डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी...

Gang attack on brothers due to prior enmity, attempted murder; Incidents at the camp | Pune: पूर्ववैमनस्यातून भावांवर टोळक्याचा हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न; कॅम्पमधील घटना

Pune: पूर्ववैमनस्यातून भावांवर टोळक्याचा हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न; कॅम्पमधील घटना

पुणे : पूर्ववैमनस्यातून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने दोघा भावांवर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्या दोन मित्रांवर वार करून परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी अनिरुद्ध अनिल जगताप (वय २५, रा.न्यू मोदीखाना, कॅम्प) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी ॲलेक्स गवळी व त्याच्या दहा ते पंधरा साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आझम कॅम्प गेटकडून पुना कॉलेज गेट नं. २ रोडवर रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ पंकज जगताप, मित्र साहिल व कौस्तुभ हे बोलत थांबले होते. यावेळी पाच ते सहा गाड्यांवर आरोपी आले. ॲलेक्स गवळी याने पूर्ववैमनस्यातून फिर्यादी व त्यांच्या भावाला जीवे ठार मारण्याचा उद्देशाने त्यांना जिवंत सोडू नका, असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्याच्या तावडीतून सुटका करून फिर्यादी पळून जात असताना, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन कोठेतरी पडून गहाळ झाली.

फिर्यादीचा चुलत भाऊ पंकज जगताप याच्या उजव्या हाताला, दंडावर व डोक्यावर कोयत्याने वार करून जबर जखमी केले. त्यांचा मित्र साहिल याच्या पाठीवर व उजव्या पायावर वार केले. कौस्तुभ याच्या पोटात वार करून जखमी केले. आमच्या नादाला लागू नका, असे म्हणून हातातील हत्यारे फिरवत त्यांनी परिसरात दहशत पसरविली. सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Gang attack on brothers due to prior enmity, attempted murder; Incidents at the camp