शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 21:06 IST2024-01-31T21:04:59+5:302024-01-31T21:06:47+5:30
शरद मोहोळ हत्या प्रकरणील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक करण्यात आली आहे.

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक
पुणे- शरद मोहोळ हत्या प्रकरणील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक करण्यात आली आहे. पाठलाग करत गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. मुख्य आरोपी गणेश मारणेला नाशिक रोड येथून अटक केली.
गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांवर ‘मोक्का’
गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. शरद मोहोळचा ५ जानेवारी रोजी कोथरूड येथील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता.
याप्रकरणी गुन्हे शाखेने साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली आहे. तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार हे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.