शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

गणेशमंडळांनी अधिकृत वीजजोड घ्यावी ; महावितरणचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:23 AM

सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला व विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा दर्जेदार हवी.

पुणे : वीज दिसत नसली तरी तिचे भयंकर जीवघेणे परिणाम होवू शकतात. त्यामुळे अगामी गणेशोत्सवात गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी. पथ दिव्यांवरुन, मंडळाच्या कार्यकर्त्याच्या घरातून अथवा थेट विद्युत वाहिनीवर आकडे टाकून वीज घेऊ नये, असे आवाहन महावितरणच्या वतीने केले आहे. सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे ४ रुपये ५५ पैसे वीजदर आहेत. तसेच कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत याच दराने पैसे आकारणार आहेत. घरगुती दरांपेक्षाही विद्युत दर कमी असल्याने अधिकृत विद्युत जोड घेऊन अपघात टाळावे, असे महावितरणच्या अधिकाºयांना सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला व विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा दर्जेदार हवी. गणेशोत्सवातील मंडप, रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी विद्युत संचमांडणी ही परवानाधारक कंत्राटदारांकडून करून घेतली पाहिजे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी अहवाल देखील घेतला पाहिजे. इलेक्ट्रिक मीटर व इतर स्विचगिअर्स लावलेली जागा देखभालीसाठी मोकळी ठेवावी. तसेच मीटर व स्विचगिअर्सवर पाणी गळणार नाही याचीही दक्षता घेतली जावी. महावितरणकडून मंजूर केलेल्या विद्युतभारानुसार जोडभार संचमांडणीत जोडणे आवश्यक आहे. विद्युतभार सोसूशकतील अशी वायरींग असावी. संचमांडणीत दोन स्वतंत्र अर्थिंगची जोडणी केली पाहिजे. जनित्र वापरत असल्यास बॉडी व न्यूट्रलसाठी स्वतंत्र अर्थिंग जोडणे आवश्यक आहे. यासोबतच मीटर, स्विचगिअर्स, विद्युत उपकरणांजवळ धोक्याची सूचना देणारा फलक लावला पाहिजे.मंडपासाठी पत्रे-टिनांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या पण टेपने जोडल्या असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह वीज अपघाताची शक्यता असते. संचमांडणीत कुठेही वायर्स प्लगमध्ये खोचू नयेत, पंखे, फ्लड लाईट्सची जोडणी ही थ्रीपीनने करावी, हॅलोजन, फ्लड लाईटस किंवा जोड असलेल्या वायर्सजवळ सिल्क कपडा, मंडप किंवा इतर ज्वालाग्राही पदार्थ ठेऊ नयेत. वीजपुरवठा करणारी वायर लोखंडी ग्रील, अल्यूमिनियम, स्टील आदींच्या संपर्कात येणार नाही याचीही काळजी घ्यावी. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८