शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

गॅलेक्सी ग्रुपच्या संस्थापक संचालकांना अटक : एटीएस आणि सीआयडीची संयुक्त कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 8:08 PM

वीस वर्षांपासून फरार असलेल्या गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीच्या दोन संस्थापक-संचालकांना अटक केली आहे. 

ठळक मुद्देपरताव्याच्या आमिषाने ठेवीदारांना घातला होता गंडागॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या अंतर्गत पाच वेगवेगळ्या उप कंपन्यांचा समावेशसीआयडीच्या तपासामध्ये या पाचही कंपन्या आरबीआयकडे गैर बॅकिंग कंपन्या म्हणून नोंदणीकृत

पुणे : गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीच्या वीस वर्षांपासून फरार असलेल्या दोन संस्थापक-संचालकांना उत्तरप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथक आणि सीआयडीच्या भरारी पथकाने संयुक्त कारवाई करीत अटक केली आहे. सतीशचंद्र भगवतीप्रसाद मिश्रा (वय ६५, रा. संत कबीर नगर), रामकृष्ण प्रेमचंद दुबे (वय ५८, रा खलीलाबाद, संत कबीरनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर प्रमोदकुमार गंगा पांडे, अमोदकुमार पांडे, घन:श्याम कालीप्रसाद पांडे, मैफतुल्लाखान अब्दुलमजीद खाल, रहेफिरदौस अफताब अहमद सिद्दीकी, सतेंद्र वशिष्ठ त्रिपाठी (सर्व रा. उत्तरप्रदेश) यांच्या अटकेचे प्रयत्न सुरु आहेत. गॅलेक्सी कंपनीविरुद्ध उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह महाराष्ट्रात दाखल असलेल्या २६ गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही आरोपी फरारी होते. त्यांच्याबद्दल सीआयडीचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांना माहिती मिळाली होती. त्यांनी उत्तरप्रदेशचे दहशतवादविरोधी पथकाचे अतिरीक्त पोलीस महासंचालक असीम अरुण यांच्याशी संपर्क साधला. सीआयडीचे एक पथक उत्तरप्रदेशात पाठविण्यात आले. उत्तरप्रदेश एटीएस आणि महाराष्ट्र सीआयडी यांची संयुक्तपणे कारवाई करीत दोघांना लखनऊमध्ये अटक केली. आरोपींना नागपूर न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.====गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या अंतर्गत पाच वेगवेगळ्या उप कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांची रजिस्टर ऑफ कंपनीज, कानपूर कार्यालयामध्ये नोंद करण्यात आलेली होती. महाराष्ट्रामध्ये या कंपनीच्या तब्बल १०२ शाखा होत्या. कंपनीने अधिक व्याजाचे आमिष दाखवत लोकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी घेतल्या. प्रत्यक्षात त्यांना कोणताही परतावा अथवा व्याज न देता १९९९ साली ७ कोटी ८ लाख ४९ हजार २६६ रुपयांचा अपहार करुन कंपनीने गाशा गुंडाळला होता. त्यानंतर ठेवीदारांनी वर्धा, नागपूर, अकोला, यवतमाळ, वासिम, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, बीड, लातूर, ठाणे, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये गुन्हे दाखल झाले होते. ====सीआयडीच्या तपासामध्ये या पाचही कंपन्या आरबीआयकडे  गैर बॅकिंग कंपन्या (एनबीएफसी) म्हणून नोंदणीकृत नसल्याचे व कंपनीला ठेवी जमा करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आलेले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत ४ कोटी, ८६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ====आरोपींची माहिती मिळाल्यावर पोलीस उपमहानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक (आर्थिक गुन्हे) पल्लवी बर्गे, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, यशवंत निकम आणि पोलीस हवालदार कृष्णकांत देसाई, दत्तात्रय भापकर यांनी परिश्रम घेतले. लखनऊमध्ये पथक दाखल झाल्यानंतर तब्बल चार दिवस तेथे तळ ठोकावा लागला. आरोपींवर बारीक लक्ष ठेवत त्यांना संधी पाहून जेरबंद करण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेAnti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी