मोबाइलवर अश्लील चित्रफिती दाखवून अत्याचार करणारा गजाआड
By नितीश गोवंडे | Updated: October 11, 2023 17:45 IST2023-10-11T17:44:34+5:302023-10-11T17:45:07+5:30
आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

मोबाइलवर अश्लील चित्रफिती दाखवून अत्याचार करणारा गजाआड
पुणे : अल्पवयीन मुलीला मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ऋत्विक गणेश दुगड (२३, रा. विघ्नहर्तानगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अल्पवयीन मुलगी तिच्या आजीच्या घरी राहत होती. दुगडने अल्पवयीन मुलीला मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केले. दुगडच्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी घाबरली. हा प्रकार २०१७ ते २०२० दरम्यान वारंवार घडला असून यामुळे पीडित मुलीला मानसिक विकाराने ग्रासले. अखेर मुलीने या प्रकाराची माहिती आईला दिली. मुलीच्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर दुगडला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपी ऋत्विक दुगड याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तावडे करत आहेत.