राजकीय भेटींविनाच झाला गडकरींचा पुणे दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 07:00 AM2019-11-16T07:00:00+5:302019-11-16T07:00:01+5:30

खासदार, आमदार नाही की महापौर व गेला बाजार तर फारसे नगरसेवकही गडकरींच्या भेटीला आले नाहीत...

Gadkari's visit came without political visits | राजकीय भेटींविनाच झाला गडकरींचा पुणे दौरा

राजकीय भेटींविनाच झाला गडकरींचा पुणे दौरा

Next
ठळक मुद्देमुंबईत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची शुक्रवारी बैठक नवनिर्वाचित आमदारही सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरू असल्यामुळे मुंबईत मुक्कामी

पुणे: खासदार, आमदार नाही की महापौरही नाहीत व गेला बाजार म्हणाल तर फारसे नगरसेवकही भेटीला आले नाहीत, त्यामुळे राजकीय भेटींविनाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा पुणे दौरा शुक्रवारी पार पडला. राजकीय गर्दी नव्हती, मात्र त्यामुळे गडकरी नाराज झाले नाही तर खूषच झाले असे आज त्यांच्यासमवेत असणाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची शुक्रवारी बैठक होती. तसेच पक्षाचेकी पुण्यातील सगळे नवनिर्वाचित आमदारही मुंबईत सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरू असल्यामुळे तिथेच मुक्काम ठोकून आहेत. त्यांना पक्षानेच मुंबई सोडून जायला मनाई केली आहे. त्यामुळेच खासदार गिरीश बापट, आमदार झालेल्या महापौर मुक्ता टिळक, प्रदेशाध्यक्ष असलेले आमदार चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष असलेल्या आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले आमदार सुनिल कांबळे असे सगळे आमदार मुंबईत होते. 
मुंबईतच भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी होणार होती. त्यामुळे त्या बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह प्रदेशचे सगळेच पदाधिकारीही मुंबईला गेले होते. गडकरीही गुरूवारी मुंबईतच होते. तिथेच त्यांनी पुण्यातील आमदारांची व पदाधिकाºयांची भेट घेतली असल्याची माहिती मिळाली. पुण्यातील आमदार त्यांना मुंबईत रात्री भेटले. गडकरी यांनी त्यांच्याकडून केंद्राकडून पुण्यात सुरू असलेल्या काही प्रकल्पांची माहिती घेतली असल्याचे समजते. त्यात प्रामुख्याने चांदणी चौक येथील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाचा समावेश होता.
 खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर त्यांच्या मतदारसंघातच गडकरी यांचा कार्यक्रम असल्यामुळे पुण्यात उपस्थित होते. गुरूवारी रात्रीच ते मुंबईतून पुण्यात परत आले होते, मात्र ते कार्यक्रमाच्या तयारीत उपस्थित असल्यामुळे गडकरी यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत. विमानतळावर गडकरी यांचे स्वागत माजी नगरसेवक व शहर पदाधिकारी उज्वल केसकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे यांनी केले. त्यानंतर त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी कोरेगाव पार्क येथेही हेच दोघे उपस्थित होते. 
दिवसभराचा वेळ गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांसमवेत बैठका घेण्यात घालवला. दुपारी ३ नंतर त्यांचे जाहीर कार्यक्रम होते. त्यामुळे ३ पर्यंत त्यांनी बैठका घेतल्या व अधिकाºयांना कामाला गती देण्यासंबधीच्या सुचना दिल्या. त्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन तेआंबेगाव बुद्रुक येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. सायंकाळी गरवारे महाविद्यालयातील पुर्वनियोजीत कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. रात्री उशीराच्या विमानाने ते रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले. राजकीय गर्दी नसल्यामुळे नाराज न होता उलट गडकरी यांनी त्याबद्दल मिश्किलपणे समाधानच व्यक्त केले असे त्यांच्यासमवेत असणाºयांनी सांगितले. 

Web Title: Gadkari's visit came without political visits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.