शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

प्लॅस्टिकमधून होणार इंधननिर्मिती : पुणे पालिकेचा प्रकल्प 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 12:40 PM

प्लॅस्टिक कचऱ्यामधून इंधननिर्मिती प्रकल्पातून सुमारे दीड हजार मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लागेल.

ठळक मुद्देखासगी कंपनीकडून सीएसआरमार्फत चालविला जाणारया प्रकल्पातून डिझेल, पेट्रोल, क्रूड ऑईलची निर्मिती केली जाणार

पुणे : प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने इंधननिर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यामधून इंधननिर्मिती केली जाईल. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयासमोरील कचरा रॅम्पवर चार मेट्रिक टनांचा प्रकल्प उभारण्यात येत असून तो सीएसआर फंडामधून उभा केला जाणार आहे. यातील एका प्रकल्पावर दिवसाला १,६०० ते १,७०० लिटर इंधननिर्मिती होणार असून वर्षाकाठी साधारणपणे १,४६० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल. प्लॅस्टिक कचºयाचे विघटन होत नसल्याने होणारी पर्यावरणीय हानी मोठी आहे. या कचऱ्याचा पुनर्वापर करून त्यापासून इंधननिर्मिती करण्यासाठी पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर एक मेट्रिक टनाचा प्रकल्प घोले रस्त्यावर उभारला होता. आता या ठिकाणी प्रतिदिन चार मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उभारला जात आहे. खासगी कंपनी या प्रकल्पासाठी गुंतवणूक करणार असून पालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. या प्रकल्पातून डिझेल, पेट्रोल, क्रूड ऑईलची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या वर्षी निविदा प्रक्रिया राबविली होती. या प्रकल्पासाठी पालिका जागा, विद्युत आणि पाण्याची सुविधा द्यावी लागणार आहे. विजेचे बील कंपनीच भरणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दीड कोटी गुंतवणूक करावी लागणार असून पालिकेला वर्षाकाठी दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे........

प्लॅस्टिकचे गट्टू : वापरून इंधननिर्मिती होतेघोले रस्त्यावर प्रतिदिन एक मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधननिर्मिती करण्यासाठीचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आला होता. पालिकेने या प्रकल्पासाठी गॅसिफायर, इन्सिनरेटर खरेदी केले होते. 

प्रशिक्षित मनुष्यबळासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या ठिकाणी प्लॅस्टिकचे गट्टू तयार करून पिरंगुट येथील एका कंपनीमध्ये नेले जात होते. तेथे या गट्टूंचा वापर करून इंधननिर्मिती केली जाते. या कंपनीचे मालक प्लॅस्टिकमधून तयार झालेले पेट्रोल स्वत:च्या गाडीसाठी वापरतात.........प्लॅस्टिक कचऱ्यामधून इंधननिर्मिती प्रकल्पातून सुमारे दीड हजार मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लागेल. यासोबतच कोरेगाव पार्क येथेही चार मेट्रिक टनांचा प्रकल्प उभारला जाणार असून तो येत्या सहा महिन्यांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्पही सीएसआरमधून केला जाईल. या ठिकाणी प्लॅस्टिकमधून पेट्रोल, डिझेल आणि क्रूड तेलाची निर्मिती केली जाणार आहे.- ज्ञानेश्वर मोळक, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग.....

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न