शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीत गौडबंगाल : विवेक वेलणकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 7:53 PM

एकाच रस्त्यावरून धावलेल्या वाहनांच्या संख्येत तिपटीचा फरक असूनही जमा झालेल्या टोलची रक्कम मात्र जवळपास सारखीच आहे...

ठळक मुद्देआधीच्या कंत्राटदाराकडूनही प्रतिमहिना सुमारे ६० कोटी रुपयांची टोलवसुली झाल्याचे नमुद

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर करण्यात आलेल्या टोलवसुलीमध्ये गौडबंगाल असल्याचा आरोप सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. पुर्वीच्या कंत्राटदाराने दिलेल्या आकडेवारीनुसार एका महिन्यात सरासरी ४३ लाख वाहने या मार्गावरून गेली. नवीन कंत्राटदाराच्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात सुमारे १७ लाख वाहनांचा टोल घेण्यात आला. वाहनांचे आकडे वेगळे असून जमा झालेल्या टोलची रक्कम जवळपास सारखीच असल्याचे निष्पन्न झाल्याचे वेलणकर यांनी सांगितले. द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीचे कंत्राट २००४ मध्ये १५ वर्षांसाठी कंत्राटदाराला दिले गेले. त्याची मुदत दि. ९ ऑगस्ट रोजी संपली. त्यानंतर दि. १० ऑगस्टपासून तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या कंत्राटदाराला टोलवसुली कंत्राट देण्यात आले आहे. या कंत्राटदाराने सप्टेबर महिन्यात जमा झालेल्या टोलची रक्कम व वाहनांची संख्या महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या माहितीनुसार, आधीच्या कंत्राटदाराने एप्रिल ते जुलै २०१९  या चार महिन्यात मिळून महामार्गावर १ कोटी ७२ लाख ५० हजार ३९१ वाहने धावल्याचे दाखवले आहे. त्यानुसार सरासरी ४३ लाख वाहने प्रतिमहिना धावली. यामध्ये टोल न भरलेल्या वाहनांचाही समावेश असल्याचे कंत्राटदाराने नमूद केले आहे. नवीन कंत्राटदाराने सप्टेंबर २०१९ ची आकडेवारी दिली असून त्यामध्ये सप्टेंबर महिन्यात याच रस्त्यावरून १६.९० लाख वाहने धावल्याचे दाखवले गेले आहे. विशेष म्हणजे त्यांनी या महिन्यात सुमारे ५९ कोटी रुपयांची टोल वसुली झाल्याचे म्हटले आहे. तर आधीच्या कंत्राटदाराकडूनही प्रतिमहिना सुमारे ६० कोटी रुपयांची टोलवसुली झाल्याचे नमुद केले आहे. एकाच रस्त्यावरून धावलेल्या वाहनांच्या संख्येत तिपटीचा फरक असूनही जमा झालेल्या टोलची रक्कम मात्र जवळपास सारखीच आहे. त्यामुळे या टोलवसुलीत गौडबंगाल असल्याचे स्पष्टपणे दिसते, असे वेलणकर यांनी सांगितले. याबाबत तातडीने या आकडेवारीच्या गौडबंगालाची चौकशी करून वस्तुनिष्ठ आकडेवारी प्रसिद्ध करावी, अशी मागणी वेलणकर यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. ----------------

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईhighwayमहामार्गfraudधोकेबाजी